शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश सरकारची ‘लर्न अँड अर्न’ योजना, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज करणार सुरुवात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:47 IST

Madhya Pradesh: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील तरुणांचं हित आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक विकासामध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्याच दिशेने एक पाऊल टाकताना शिवराज सिंह चौहान यांनी अर्न अँड लर्न (शिका आणि कमवा) ही योजना सुरू केली आहे.

यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारकडून अनेक योजनांची सुरुवात होत आहे. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील तरुणांचं हित आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक विकासामध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्याच दिशेने एक पाऊल टाकताना शिवराज सिंह चौहान यांनी अर्न अँड लर्न (शिका आणि कमवा) ही योजना सुरू केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज या योजनेची औपचारिक सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमावेळी शिवराज सिंह चौहान हे विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत. 

मुख्यमंत्री शिका आणि कमवा योजनेमधून प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना उद्योगाभिमुख नवं तंत्रज्ञान आणि प्रकियांमध्ये दक्षता आणण्यासाठी प्रशिक्षित केलं जाईल. त्यामुळे त्यांना सजगपणे रोजगा मिळू शकेल. या योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षित केलं जाईल. 

मध्य प्रदेश सरकारने  यावर्षी आपलं युवा धोरण जाहीर केलं होतं. जिथे एक युवा पोर्टलसुद्धा सुरू केलं आहे. यामध्ये समग्र विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. शिका आणि कमवा योजनासुद्धा एकप्रकारे सरकारच्या नव्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आवश्यकतेनुसार हे लक्ष्य वाढवण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत लागू करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमाची यादी ही www.mmsky.mp.gov.in या योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. या पोर्टलवर नोंदणी २६ जूनपासून सुरू झाली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २९ ही वयोमर्यादा आहे. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक योग्यतेनुसार ८ हजार, ८ हजार ५००, ९ हजार आणि कमाल १० हजार रुपये एवढं दरमहा स्टायपेंड मिळणार आहे.   

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा