शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CM शिवराज सिंह चौहान यांची स्पष्टोक्ती, 'दीनदयाल रसोई' योजनेचे नाव बदलले जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 20:48 IST

'दीनदयाल रसोई' अंतर्गत मध्य प्रदेशातील गरीब नागरिकांना पाच रुपयांत जेवण दिले जाते.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी 'दीनदयाल रसोई'(Deendayal Rasoi) बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या दीनदयाल रासोईच्या नावात कोणताही बदल होणार नाही, अशी स्पक्टोक्ती त्यांनी दिली. कॅबिनेटमध्ये दीनदयाल रसोईला 'मामा की थाली' नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

सीएम शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, 'ही योजना दीनदयाल रसोई याच नावाने सुरू राहील, नावात कोणताही बदल केला जाणार नाही. नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तो प्रस्ताव मान्य केला नाही.' 

बैठकीत सर्व मंत्र्यांचे नाव बदलण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देत ​​या योजनेचा विस्तार पालिका स्तरापर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, ही थाली दहाऐवजी पाच रुपयांत मिळणार असून, दीनदयाल रसोईसोबतच मामा की थाली हे नावही जोडले जाईल, असे ते म्हणाले होते. पण, काही वेळातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, या योजनेचे नाव दीनदयाल रसोई राहील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. 

काय आहे दीनदयाल रसोई? राज्यातील शहरी भागात व्यवसाय आणि मजुरीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीबांना 'दीनदयाळ अंत्योदय भोजन योजना' सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत अतिशय स्वस्तात जेवन दिले जाते. ही योजना सर्व जिल्हा मुख्यालयांसह मैहर, अमरकंटक, महेश्वर, ओंकारेश्वर, चित्रकूट अशा 6 धार्मिक शहरांमध्ये कार्यरत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपा