शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:12 IST

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रणदीप सुरजेवाला यांना पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे.

Madhya Pradesh Assembly Election: या वर्षीच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजप आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळवून देणारे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडे पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. कर्नाटकचे प्रभारी असलेले सुरजेवाला यांना मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यादेखील मध्य प्रदेशात सातत्याने सभा घेत आहेत. कर्नाटक निवडणुकीतही प्रियंकांनी जोरदार सभा घेतल्या होत्या. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला. आता सुरजेवाला आणि प्रियंका गांधी यांची ही जोडी मध्य प्रदेशातही एकत्रितपणे काम करणार आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेससमोर कर्नाटकासारखीच स्थिती आहे. पक्षाने 2020 मध्ये सुरजेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. तो काळ असा होता की, प्रादेशिक नेत्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची समस्या शिगेला पोहोचली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कर्नाटकात 28 पैकी फक्त एक जागा जिंकता आली. अशा वेळी पक्षाने सुरजेवाला यांना पदभार दिला.

मध्य प्रदेशात पक्ष कमलनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहे. या निवडणुकीत तिकीट वाटप महत्त्वाचे ठरणार आहे. सिंधिया यांच्या जाण्याने पक्षाला अनेक भागात नव्या नेत्यांना संधी द्यावी लागणार आहे, तर अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकिटे कापावी लागणार आहेत, त्यामुळे पक्षात बंडखोरीही पाहायला मिळू शकते. कमलनाथ यांच्या दीड वर्षाच्या सरकारमध्ये पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. सुरजेवालांना त्यांचे मन वळवणे आणि पक्षात त्यांना योग्य सन्मान देण्याचे कामही असेल.

सुरजेवाला यांना मध्य प्रदेशात निरीक्षक म्हणून निवडणुकीची रणनीती बनवावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे रणनीतीचे काम स्वतःच्या हाती घेतल्यामुळे काँग्रेससमोर वाट बिकट असणार आहे. भाजपचे चाणक्य अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशची निवडणूक भाजप केंद्रीय नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमित शहाही राज्यात दौरे करत आहेत. अशा परिस्थितीत सुरजेवाला आणि प्रियंका गांधींसमोर भाजपचे तगडे आव्हान असणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा