शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळमध्ये १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला कमलनाथ यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 08:57 IST

हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावर कमलनाथ यांचे इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी देखील मतभेद आहेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : मध्यप्रदेशात १ ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीची सभा घेण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर, काँग्रेस पक्ष नेतृत्वानेही या मुद्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी १ ऑक्टोबर रोजी भोपाळमध्ये सभा घेण्याचे निश्चित करण्यापूर्वी सल्लाही घेतला नाही, त्यामुळे कमलनाथ हे नाराज आहेत. कमलनाथ यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांना सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राज्यातील काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत आभासी युद्ध करत आहे. दरम्यान, यानंतर ही रॅली रद्द करण्यात आली. 

काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना सांगितले की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संयुक्त रॅलीसाठी तयारी करणे कठीण होईल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पाही याच कारणामुळे अडचणीत आला आहे. कमलनाथ यांनी स्पष्ट केले की, भाजपचा सामना करण्यासाठी राज्यातील काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह भाजपचे नेते राज्यात अक्षरश: तळ ठोकून आहेत. दुसरे म्हणजे, समाजवादी पक्ष, आप आणि इतर पक्षांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची त्यांची योजना आधीच जाहीर केली आहे.

हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावर कमलनाथ यांचे इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी देखील मतभेद आहेत. तर, द्रमुकची उपस्थिती काँग्रेससाठी पेच निर्माण करणारी ठरणार आहे. 

कमलनाथ हे आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांपेक्षा कट्टर हिंदू म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी भाजपशी स्पर्धा करत आहेत. साधू-संत भाजपचा प्रचार करत असताना त्यांनी भोपाळमध्ये बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक झाली होती. यावेळी काँग्रेस नेतृत्वाने भोपाळ येथे विरोधी पक्षांची संयुक्त सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस