शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसला वाटत होतं राम मंदिर बनणारच नाही, पण...' पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 14:14 IST

17 नोव्हेंबर तारीख जस-जशी जवळ येत आहे, तस-तसे काँग्रेसच्या नेत्यांच्या आश्वासनांची पोल खोल होत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव मान्य करून, स्वतःला नशिबाच्या भरवशावर सोडले असल्याच्या बातम्या आम्हाला संपूर्ण मध्यप्रदेशातून मिळत आहेत, असेही मोदी म्हणाले.

'हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्याला वाटत होतं की, राम मंदीर बनणारच नाही, मात्र, अयोध्येत भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आहे. आम्ही जे करतो, ते करून दाखवतो,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेशातील बैतूल येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला.

मोदी म्हणाले, आपण उद्या आदिवासी गौरव दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या भूमीवर जात आहोत. आम्ही सरकारची तिजोरी गरिबांसाठी खुली केली आहे. काँग्रेसच्या पंजाला केवळ लुटणेच माहीत आहे. उद्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भाजप 24 हजार कोटी रुपयांची मोठी योजना सुरू करत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव स्वीकारल्याची माहितीही आम्हाला मध्यप्रदेशातून मिळत आहे.

मोदीच्या गॅरंटीसमोर काँग्रेसची खोटी आश्वासने टिकू शकत नाहीत -काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, मध्य प्रदेशात काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. मोदीच्या गॅरंटीसमोर काँग्रेसची खोटी आश्वासने क्षणभरही टिकू शकत नाहीत, हे काँग्रेसने मान्य केले आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे, गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. 17 नोव्हेंबर तारीख जस-जशी जवळ येत आहे, तस-तसे काँग्रेसच्या नेत्यांच्या आश्वासनांची पोल खोल होत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव मान्य करून, स्वतःला नशिबाच्या भरवशावर सोडले असल्याच्या बातम्या आम्हाला संपूर्ण मध्यप्रदेशातून मिळत आहेत, असेही मोदी म्हणाले.

भाजपच्या संकल्प पत्राचाही उल्लेख -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश भाजपच्या संकल्प पत्रावरही भाष्य केले. ते म्हणाले, मध्य प्रदेश भाजपने प्रत्येक क्षेत्रासाठी आणि प्रत्येक विभागासाठी एक सुंदर संकल्प पत्र जारी केले आहे. हे संकल्प पत्र म्हणजे, मध्य प्रदेशातील जनतेचे विकास पत्र आहे. प्रत्येक आदिवासीबहुल गटात एकलव्य निवासी शाळा, प्रत्येक आदिवासी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, लाडली बहन अंतर्गत आर्थिक मदत, याच बरोबर, कायमची पक्की घरे आणि शेतकऱ्यांच्या भात-गव्हासाठी एमएसपीसाठी मध्य प्रदेश भाजपच्या गॅरंटीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेस