Congress vs SP: केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (india alliance) स्थापन केली आहे. पण, अजूनही विरोधकांना एकजूट होता आले नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav) सातत्याने काँग्रेसवर (congress) टीका करत आहेत. रविवारी मध्य प्रदेशातील टिकमगड येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अखिलेश यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला कपटी पार्टी म्हणत, नागरिकांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले.
काँग्रेसची मते भाजपला गेलीयूपीचे माजी मुख्यमंत्री यावेळी म्हणतात, काँग्रेस पक्षाबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. ते आमचा विश्वासघात करू शकतात, मग तुम्ही त्यांच्यासाठी कोणत आहात. अशा लोकांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काँग्रेसनेही जातीवर आधारित जनगणनेची मागणी सुरू केली आहे. काँग्रेसला हे हवंय, कारण त्यांची सर्व मते भाजपला गेली आहेत. ही मते परत मिळविण्यासाठी काँग्रेस जात जनगणनेची मागणी करत आहे, अशी टीका अखिलेश यादवांनी यावेळी केली.
काँग्रेस विश्वासघात करणारमध्य प्रदेशात जागावाटपावरुन मतभेद निर्माण झाल्यापासून अखिलेश यादव काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. अखिलेश यांनी एका दिवसापूर्वी, म्हणजेच शनिवारी मध्य प्रदेशातील छतरपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस भाजपची भाषा बोलत असल्याची टीका केली होती. सपा उमेदवारांच्या घोडेबाजाराबद्दल विचारले असता अखिलेश म्हणाले की, यावरुनच काँग्रेसचे इरादे दिसून येतात. एमपीच्या लोकांनी पाहिलंय, आघाडीचा विश्वासघात कोणी केला, तर तो पक्ष काँग्रेस आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
काँग्रेस-सपा 'India' आघाडीतविशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीत काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षासह दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांचा समावेश आहे. भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी ही आघाडी स्थापन केली आहे. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आहेत. या मतभेदाची सुरुवात मध्य प्रदेश निवडणुकीपासून झाली, आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.