शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

मध्य प्रदेश! धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवर बंदी; CM होताच मोहन यादव यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 20:09 IST

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांनी बंदी घातली आहे. राजधानी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी आज भोपाळमध्ये मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. पहिलाच निर्णय त्यांनी मोठा घेऊन लाऊडस्पीकर विरोधात कठोर भूमिका घेतली.

दरम्यान, मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांसह सर्वत्र लाऊडस्पीकरच्या वापरावर मुख्यमंत्र्यांनी बंदी घातली आहे. मर्यादित आवाज सोडायला हवा, असे ते यावेळी म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लाऊडस्पीकर तपासण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पथके तयार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ.मोहन यादव यांनी त्यांच्या जन्मगावी उज्जैन येथे जाऊन तेथे महाकालचे दर्शन घेतले. तिथून ते थेट भोपाळला परतले आणि त्यांनी बैठक घेतली. 

मोहन यादव यांचा मोठा निर्णय भोपाळमध्ये कॅबिनेटची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांना तिथे जायला उशीर होत होता. त्यामुळे महाकालची पूजा आणि आरती झाल्यानंतर ते लगेच भोपाळकडे रवाना झाले. महाकालचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, "शपथ घेतल्यानंतर मी बाबा महाकालच्या दरबारात आलो आहे. माझ्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे, म्हणून मी बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो. कॅबिनेट बैठकीसाठी मी भोपाळला रवाना होत आहे. यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचे सरकार मध्य प्रदेशात आणखी प्रगती करेल."

कोण आहेत मोहन यादव?मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीReligious Placesधार्मिक स्थळे