शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

उज्जैन बलात्कार प्रकरण! मुलाला जेलमध्ये का नेलं सरळ गोळ्या घाला; आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:45 IST

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय तरूणीवर अत्याचार करून नराधमांनी तिला नग्न अवस्थेत सोडून दिले.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय तरूणीवर अत्याचार करून नराधमांनी तिला नग्न अवस्थेत सोडून दिले. नराधमांनी चिमुरडीवर अत्याचार केला, तिचा छळ करून अर्धनग्न अवस्थेत सोडले. अंगावर काटा आणणारी दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आलं. १२ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. या प्रकरणी उज्जैन पोलिसांनी  रिक्षा चालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. 

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी एक मोठे विधान केले आहे. "माझा मुलगा खरोखरच आरोपी असेल तर त्याला जेलमध्ये न्यायला नको होते, त्याला थेट गोळ्या घालायला हव्या होत्या. माझ्या मुलाच्या जागी मी असा गुन्हा केला असता तर मी आत्महत्या केली असती आणि पोलिसांच्या हाती देखील लागलो नसतो", असे आरोपीच्या वडिलांनी सांगितले. आरोपी भरत सोनीचे वडील राजू सोनी हे एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

आरोपीच्या वडिलांनी आणखी सांगितले की, पोलिसांनी मुलाला अटक करून पोलीस ठाण्यात का नेले? त्याला गोळ्या घालायला हव्या होत्या. त्या पीडितेच्या जागी माझी मुलगी असती तर मलाही तेच हवे होते. जो कोणी असा गुन्हा करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही. मुलगा माझा असो वा कोणाचाही जो गुन्हा करेल त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. किंवा गोळ्या झाडून मारायला हवे. आम्हाला घराबाहेर जायला लाज वाटत आहे. मी आता काय करू? मला काहीच समजत नाही, मुलाच्या जागी मी असतो तर गुन्ह्याची कबुली देऊन मरून गेलो असतो. पोलिसांच्या हातीही लागलो नसतो. 

पुजाऱ्याने सांगितला धक्कादायक थरारपीडित तरूणी नग्न अवस्थेत फिरत असताना मदतीला आलेल्या देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी