शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

बापू ‘हे राम’ म्हणायचे, काँग्रेस तर ‘राम’ही म्हणत नाही : मोहन यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 8:14 AM

Mohan Yadav Interview: मुख्यमंत्र्यांची ‘लोकमत’ला मुलाखत : यावेळी २९ पैकी २९ लोकसभेच्या जागा जिंकणार

रोजगार, पेपरफुटी, धार्मिक राजकारण अशा विविध मुद्द्यांवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी लोकमतचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि ज्येष्ठ प्रतिनिधी अनुराग श्रीवास्तव यांनी थेट संवाद साधला. त्याचा हा सारांश... 

  • २०१९मध्ये भाजपला २८, तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. डॉ. मोहन यादव त्यांच्या पहिल्या परीक्षेत किती जागांवर उत्तीर्ण होतील?

मुख्यमंत्री मोहन यादव : पंतप्रधान मोदीजींनी १० वर्षांत खूप मेहनत केली आहे आणि त्यांच्या कामाची शैली अशी आहे की, पहिल्या दिवसापासूनच वाटते की, पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आम्हाला फारसे कष्ट घेण्याचीही गरज नाही आणि खात्री आहे की, आम्हाला १०० टक्के यश मिळणार. आम्ही मध्य प्रदेशातील २९ पैकी २९ जागा जिंकणार आहोत.

  • तुमचे नाव उत्तर प्रदेश, बिहारसाठीही घेतले जात आहे, जेणेकरून तुमच्या प्रभावाने यादव मतदारांना प्रभावित करता येईल?

    माझ्या कुटुंबात एकही खासदार, मंत्री, आमदार नाही. मात्र, अशी पार्श्वभूमी असताना मला शिक्षणमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती आम्ही पार पाडू. पण, त्याला उत्तर प्रदेश, बिहारशी जोडू नका. मी आठ राज्यांचा ‘स्टार प्रचारक’ आहे, त्यामुळे पक्ष मला जिथे पाठवेल तिथे मला जायला हवे. याशिवाय मी जेथे ‘स्टार प्रचारक’ नाही तेथेही मी जायला हवे. एका छोट्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, हे केवळ भाजपमध्येच शक्य आहे.

  • जेव्हा तुमचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर झाले तेव्हा तुम्ही कुठे होता?

    आता ही गोष्ट खूप जुनी झाली. मी तुम्हाला माझी अनेक रहस्ये सांगू शकतो. मी २००३मध्ये संसदीय मंडळाकडून तिकीट आणले होते. उज्जैनमध्ये तेव्हा मी ती जबाबदारी दुसऱ्याला दिली. मी त्या क्षणाचाही साक्षीदार आहे, जेव्हा १० हजार पाठीराख्यांचा जमाव माझ्यासोबत मिरवणुकीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होता आणि तेव्हा मी दुसऱ्याला निवडणूक लढवण्याचे लिहून देतो. तो काळही मी पाहिला आहे.

  • छिंदवाडा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तेथे काय शक्यता वाटते?

    हा काँग्रेसचा ‘गड’ नसून काँग्रेसची ‘गडबड’ आहे. कमलनाथ सध्या काँग्रेसच्या बाजूने उभे आहेत, त्यांचा विचार बदलू शकतो आणि पराभवानंतर ते या बाजूला येऊ शकतात. आम्ही त्यांना पराभूत करण्यासाठी लढलो आहोत.

  • मंडला, राजगडबाबत रणनीती काय?

    आमची रणनीती अगदी स्पष्ट आहे. आम्ही कोणतेही कटकारस्थान नाही, फसवणूक नाही, खोटेपणा नाही, चाल नाही. मध्य प्रदेश हे असे राज्य आहे, जिथे जनसंघाच्या काळापासून आमची ताकद आहे. भाजपबद्दल जनतेमध्ये चांगलीच सद्भावना आहे आणि काँग्रेसने आपली विश्वासार्हता गमावली आहे. काँग्रेसचे उमेदवार तिकीट परत करत आहेत. इंदूरसारख्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शरणागती पत्करत आहेत आणि ते म्हणतात, हे सर्व भाजपचे लोक करत आहेत. अहो, भाजपवाले हे कसे करू शकतात? हिंमत असेल तर तुम्ही आमचे फोडून दाखवा. 

  • कमलनाथही भाजपमध्ये येणार?

    ‘कमल’ आमच्यासोबत आहेत. मी कमलनाथ यांच्याबद्दल बोलत नाही. कमळ हे आमचे निवडणूक चिन्ह आहे.

  • दिग्विजय सिंह म्हणत आहेत की, ही त्यांची शेवटची निवडणूक आहे ? 

    ते ज्या पद्धतीने बोलत आहेत ते पराभूत कार्यकर्त्याचे लक्षण आहे. निवडणुकीप्रमाणे निवडणुका लढा. तुम्ही तर खूप शूरवीर आहात, सैन्य देशाच्या सीमेपलीकडे जाऊन शौर्य गाजवते आणि तसे झाले की नाही, याचा पुरावा तुम्ही मागता. महात्मा गांधी ‘हे राम’ म्हणाले होते. हे तर ‘राम’ही म्हणत नाहीत.

  • संपूर्ण निवडणूक राम मंदिर, धर्म आणि तुष्टीकरण याभोवती फिरत आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?

    काँग्रेसनेच ते केले, आम्ही केले नाही. काँग्रेसने आपला जाहीरनामा सादर करून यू-टर्न घेतला आहे. ते विकासावर बोलू शकणार नाहीत, मोदीजींना रोखू शकणार नाहीत, अर्थव्यवस्था रोखू शकणार नाहीत, हे काँग्रेसला माहीत होते. देशाची अर्थव्यवस्था अकरावीवरून पाचव्या स्थानावर आणली. गरिबांना मदत करणे, कोविड काळात, विकासकामांत, रशिया-युक्रेन युद्धातून विद्यार्थ्यांना वाचवणे अशा अनेक बाबतीत मोदीजी पुढे गेले आहेत.

  • विरोधक म्हणतात की, विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोबत घेतले गेले?

    एक तरी पुरावा दाखवा. ते चुकीचे आरोप लावत आहेत. न्यायालयाने अभिषेक बाम यांच्यावरील कलम वाढवण्याचे सांगितले. न्यायालय कोणताही निर्णय घेऊ शकते. आम्ही न्यायालयीन गोष्टींत काय करणार? आमच्या म्हणण्यावरून तर कलम वाढवण्यात आले नाही. मात्र, काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे तिकीट परत करत असतील तर भाजप त्याला काय करणार? अंदमान निकोबारमधून तामिळनाडूसारख्या देशातील सर्व राज्यांमध्ये आमच्या एकाही उमेदवाराने तिकीट परत केले नाही आणि त्यांचे लोक येथे तिकीट परत करत आहेत, जेथे त्यांचे सरकार ७० वर्षे सत्तेत राहिले. ते अशा रेल्वेत बसले आहेत, ज्यात पुढेही इंजिन नाही आणि मागेही नाही. मग ते डब्यात प्रवास कसा करणार? त्यामुळे त्यांचे प्रवासी रेल्वे सोडून जात आहेत.

  •  तुम्हीही उच्च शिक्षणमंत्री राहिला आहात. तर आज विद्यार्थ्यांसाठी कोणते मुद्दे पुढे घेऊन जात आहात? 

    नवीन शैक्षणिक धोरण २०२० चा नवीन मसुदा अंमलात आणणे यासारखे अनेक बदल केले. सर्वप्रथम देशात ते लागू करण्यासाठी कोणते राज्य पुढे आले तर ते मध्य प्रदेशने. राज्याने ते धोरण पुढे नेले आणि आम्ही आमचे शिक्षण खऱ्या अर्थाने उच्च शिक्षण व्हावे यासाठी प्रयत्न केला. त्याचा अभ्यासक्रमही बदलला. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. ही शिक्षणाची रचना बदलली आहे. त्याला काय वाचायचे आहे हे त्या व्यक्तीच्या आवडीवर सोडले. मुलगा-नातू सर्वांनाच शिकायचे असेल तर सर्वांना प्रवेश मिळेल. दोन पदव्या कोणत्याही वयात घेता येईल. आम्ही अभ्यासक्रमात पवित्र ग्रंथही आणले.

  •  मध्य प्रदेशात तुम्ही मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अनेक मोठे निर्णय घेतले. ध्वनिक्षेपकावर बंदी, उघड्यावर मांसविक्री बंदी. पण भविष्यातील दृष्टिकोन काय आहे?

    आपल्या राज्याची वैशिष्ट्ये समजून घेऊन भविष्यातील विकासाची स्वप्ने पाहणे आपण महत्त्वाचे मानले आणि त्या दिशेने खूप काम केले, हे अगदी स्पष्ट आहे. मध्य प्रदेशची भौगोलिक स्थिती अशी आहे की, ते देशाचे केंद्रबिंदू आहे. येथून उत्तर, दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम कुठेही प्रवास करणे सोपे आहे.

(‘लोकमत’ हिंदीच्या यूट्यूब चॅनलवर ही मुलाखत पूर्ण पहा.)

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Madhya Pradeshमध्य प्रदेश