शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

"माझे पालकांवर प्रेम आहे, पण...", वरिष्ठांनी टोमणे मारले म्हणून २७ वर्षीय डॉक्टरनं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:41 IST

मध्य प्रदेशातील भोपाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातीलभोपाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ माजली. बाला सरस्वती या ज्युनिअर डॉक्टरने इंजेक्शनचा ओव्हरडोज घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी आता मृत डॉक्टरच्या पतीने गांधी मेडिकल कॉलेजच्या तीन डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. तीन वरिष्ठ डॉक्टरांनी माझ्या पत्नीला आळशी म्हणून टोमणे मारल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचे मृत डॉक्टरच्या पतीने म्हटले आहे.

दरम्यान, बाला सरस्वतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहली. सुसाईड नोटमध्ये विभागातील तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांना मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. सर्व काम मनापासून करूनही हलगर्जीपणाचे टोमणे मारले जात असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. "मला ज्युनिअर डॉक्टरांसमोर वरिष्ठ मंडळी आळशी आहेस असे म्हणतात. वेळेचे कोणतेही भान न ठेवता जास्त ड्युटी करायला भाग पाडले", असेही सुसाईट नोटमध्ये लिहले आहे. खरं तर ही सुसाईड नोट मृत महिला ज्युनिअर डॉक्टरने मोबाईलमध्ये लिहिली होती, तिने ही नोट तिच्या एका मैत्रिणीला व्हॉट्सपवरही पाठवली होती.

सुसाईट नोट लिहून संपवलं जीवनतसेच डॉ. बाला सरस्वती हिने सुसाईड नोटच्या माध्यमातून पालकांची माफी मागितली. "माझे माझ्या पालकांवर खूप प्रेम आहे, पण मी नाईलाजास्तव हे पाऊल उचलत आहे, त्यामुळे मला माफ करा. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. जय (पती) ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहे. मी त्याच्यासोबत आनंदी आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहिले. पण मी माझे वचन मोडते याची लाज वाटते. हे कॉलेज मला जगण्यासाठी खूप वाईट आहे. हे लोक मला कधीच सुखाने राहू देणार नाहीत", असेही सुसाईड नोटमध्ये बाला सरस्वतीने म्हटले आहे. 

विशेष बाब म्हणजे २७ वर्षीय बाला सरस्वती ही गांधी मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. बाला सरस्वती हिने रविवारी रात्री भूल देण्याच्या इंजेक्शनचा ओव्हरडोज घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी बाला सरस्वती घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली असता एकच खळबळ माजली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीbhopal-pcभोपाळDeathमृत्यूdoctorडॉक्टर