शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांनी व्यक्त केली तुरुंगात जाण्याची भीती; तिकडे मोदी म्हणाले, कारवाई सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 18:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे नाव घेऊन, भ्रष्टाचाराविरोधात आपली कारवाई सुरूच राहील. भलेही, कितीही अपशब्द बोला, मात्र आपण कारवाई करतच राहणार, असे म्हटले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सकडे दुर्लक्ष करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी मध्य प्रदेशात प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अटकेची भीतीही व्यक्त केली. या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत आपण तुरुंगात राहू शकतो. आपल्या शरीराला अटक केली जाऊ शकते पण विचारांना नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, छत्तीसगडमधील कांकेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे नाव घेऊन, भ्रष्टाचाराविरोधात आपली कारवाई सुरूच राहील. भलेही, कितीही अपशब्द बोला, मात्र आपण कारवाई करतच राहणार, असे म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत सिंगरौली येथील उमेदवार राणी अग्रवाल यांच्यासाठी रोड शो केला. यानंतर ते लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'ते मला रोज अटकेची धमकी देतात. केजरीवालच्या शरीराला तर अटक कराल, पण केजरीवालच्या विचारांना कशी अटक कराल? हजारो लाखो केजरीवालांना कशी अटक कराल?' 

केजरीवाल तुरुंगात जाण्यास घाबरत नाहीत -केजरीवाल म्हणाले, पूर्वी दिल्ली घोटाळ्यांसाठी ओळखली जात होती, पण आज चांगल्या शाळा, रुग्णालये आणि वृद्धांच्या तीर्थयात्रांची चर्चा होत आहे. अण्णांच्या आंदोलनाचा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले, सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यासह रामलीला मैदानावरील मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना अटक केली जाऊ शकते. पण आलेल्या कोट्यवधी लोकांना कसे अटक करणार? एवढेच नाही, तर त्यांनी आम्हाला अटक केली तरी हरकत नाही. केजरीवाल तुरुंगात जाण्यास घाबरत नाहीत," असेही केजरीवाल म्हणाले. 

काय म्हणाले पंतप्रधान मोदी - मोदी म्हणाले, 'ही मोदीची गॅरंटी आहे. लूट करणारा एकही सुटणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. याच कामासाठी तुम्ही मला निवडून दिले आहे. मजा करण्यासाठी निवडून दिले नाही. आपणच सांगा हे कमी करायला हवे की नको? संपूर्ण शक्तीनिशी सांगा, हे दिल्लीतील राहणाऱ्यांनाही समजायला हवे. चोर, दरोडेखोरांना शिक्षा व्हायला हवी की नको? भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला हवे की नाही? गरिबांचा पैसे परत यायला हवा की नको? आपल्या आशीर्वादाने मी हे काम थांबवणार नाही. या लोकांनी मला भलेही लाखो शिव्या देवोत, मात्र तुमच्या आशिर्वादी शक्ती आहे की, ना मोदी डगमगतो, ना मोदी घाबरतो, ना मोदी भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई रोखतो.' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा