शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले", अमित शाहांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 21:34 IST

रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

नवी दिल्ली : सत्तेत ७० वर्षे असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. तसेच, काँग्रेसने कलम ३७० (जम्मू-काश्मीरमधील) हे ७० वर्षे स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले, असे अमित शाह म्हणाले. रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा एक भाग म्हणून अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरात गरीबांचा मसिहा म्हणून ओळखले जाते, कारण ते गरीब लोकांसाठी लोककल्याणकारी काम करत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मध्य प्रदेशातील भाजपचे सरकार मध्य प्रदेशला 'डबल इंजिन सरकार' म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, कमलनाथ यांच्या आधीच्या सरकारमध्ये अवघ्या दीड वर्षात १८,००० हून अधिक वर्ग-१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या सरकारच्या कार्यकाळात दलालांच्या मदतीने एकच उद्योग सुरू झाला, तो म्हणजे हस्तांतरण उद्योग. त्यामुळे लोकांना 'श्रीमान बंटाधार' यांची राजवट आठवली, असे अमित शाह म्हणाले. तसेच, 'श्रीमान बंटाधार' आणि 'करप्शन नाथ' यांच्या सरकारच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प केवळ २३,००० कोटी रुपयांचा होता, तर शिवराज सिंह चौहान यांच्या विद्यमान सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३.१४ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेते   कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश