शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 14:45 IST

इंजिनिअरकडे सापडलेल्या संपत्तीचा अंदाज यावरून लावून शकतो की, ३० हजार महिना पगार असून तिच्या फार्म हाऊसवर ३० लाख रुपये किंमतीचा ९८ इंचाचा टीव्ही होता.

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्चपदावरील महिला सहाय्यक अभियंतेच्या फार्महाऊसवर लोकायुक्त पथकाने धाड टाकली. यावेळी महिला इंजिनिअरकडे तब्बल ७ कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे उघड झाले. सध्या महिलेच्या घरी सापडलेल्या संपत्तीचा आढावा घेतला जात आहे. 

जेव्हा लोकायुक्तच्या पथकाने महिला इंजिनिअरच्या घरी छापेमारी केली, तेव्हा ३० हजार पगार असलेल्या या अधिकाऱ्याची संपत्ती आणि आलिशान लाईफस्टाईल पाहून तपास यंत्रणेतील अधिकाही हैराण झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरच्या फार्म हाऊसवर एक स्पेशल रुम बनवण्यात आला होता. त्यात महागडी दारूसह सिगारेट उपलब्ध होत्या. महाग कार, २ ट्रक आणि महिंद्रा थारसह एकूण १० वाहने जप्त करण्यात आली. 

इंजिनिअरकडे सापडलेल्या संपत्तीचा अंदाज यावरून लावून शकतो की, ३० हजार महिना पगार असून तिच्या फार्म हाऊसवर ३० लाख रुपये किंमतीचा ९८ इंचाचा टीव्ही होता. हेमा मीणा या पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. इंजिनिअर हेमा मीणा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर लोकायुक्त पथकाने ही कारवाई केली. 

फार्म हाऊसवर मिळालेले अनेक परदेशी श्वान माहितीनुसार, लोकायुक्तच्या पथकाला आतापर्यंत इंजिनिअरकडे ७ कोटींची संपत्ती असल्याचे आढळले आहे. त्यात जमीन, वाहने, बंगला, फार्म हाऊस, लाखोंची कृषी उपकरणे, अनेक परदेशी श्वान आणि गाई, फार्म हाऊसवर ६०-७० वेगवेगळ्या ब्रीडच्या गायीदेखील आहेत. 

हेमा मीणा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही वर्षांपूर्वी अशी नव्हतीसहाय्यक अभियंता म्हणून कंत्राटावर काम करणाऱ्या हेमा मीणा यांच्याबाबत अनेक चर्चा आहेत. काही वर्षांपूर्वी हेमा मीणा यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अशी नव्हती, असे लोक सांगतात. अचानक काही वर्षात असे काय घडले की करोडोंची मालमत्ता गोळा केली. दुसरीकडे, अभियंता हेमा मीणा सांगतात की, तिच्या वडिलांनी आणि भावाने या मालमत्ता विकत घेऊन मला दान केल्या. लोकायुक्त सर्व अँगलने तपास करत आहेत. 

तीन ठिकाणी छापेमारीडीएसपीने सांगितले की, जेव्हा हेमा मीणाच्या उत्पन्नासह तिच्या मालमत्तेचे विश्लेषण केले गेले तेव्हा तिची मालमत्ता ३३२ टक्के जास्त असल्याचे आढळून आले. सध्या तीन ठिकाणी शोध घेतला जात आहे. आता मिळणाऱ्या गोष्टींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक बोलावण्यात आले असून, ते इमारतीचे मूल्यांकन करणार आहेत. यासोबतच पशुसंवर्धन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. काही बाबींचे विश्लेषण केले जात आहे.  

टॅग्स :raidधाड