शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

१५,००० सरकारी सिक्रेट फाइल्स खाक, मध्य प्रदेशमध्ये इमारतीच्या आगीने पेटला राजकीय वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 14:04 IST

काँग्रेसला षडयंत्राची शंका

अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ: मध्य प्रदेश सरकारच्या परिवहन, आरोग्य आणि आदिवासी कल्याण विभाग असलेल्या बहुमजली इमारतींपैकी एका इमारतीला सोमवारी संध्याकाळी आग लागली. यात १५,००० हून अधिक गोपनीय आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित फायली जळून खाक झाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेले सातपुडा भवन हे सहा मजली असून ही इमारत १९७० मध्ये बांधण्यात आली होती. या आगीमुळे काँग्रेसकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

अनेक सरकारी कार्यालये असलेली ही इमारत नऊ तास आगीच्या भक्ष्यस्थानी होती; पण राज्य सरकारची अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. अनेक वर्षांपासून फायर ऑडिट झालेले नाही. रात्री उशिरा लागलेल्या या आगीवर रात्रीच नियंत्रण मिळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून ही माहिती दिली आणि केंद्राची मदत मागितली. आगीसारख्या आपत्तीला तोंड देण्यासाठी अधिकृत यंत्रणांची तयारी नसल्याचे यातून उघड झाले आहे. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आगीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, विविध विभागांतील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचा हा डाव आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याच सातपुडा भवनाला आग लागली होती. त्यात महत्त्वाच्या फायलींचे नुकसान झाले होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुन्हा त्याच इमारतीला लागलेल्या आगीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

काँग्रेसला षडयंत्राची शंका

आगीमागे षडयंत्र असल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे. माजी मंत्री अरुण सुभाष यादव यांनी ट्वीट केले की, आज प्रियंका गांधी यांनी घोटाळ्यांवर हल्लाबोल केला तेव्हाच सातपुडा भवनमध्ये भीषण आग लागली. आगीच्या बहाण्याने कागदपत्रे जाळण्याचा कट तर नाही ना, ही आग मध्य प्रदेशात बदलाचे संकेत देत आहे, असे यादव म्हणाले. दरम्यान, आपनेही या आगीमागे षडयंत्राची शंका व्यक्त करत आगीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

टॅग्स :fireआगMadhya Pradeshमध्य प्रदेश