शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नाईटशिफ्ट करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे, कामाच्या अनियमित वेळामुळे होऊ शकतो हृदयरोग व कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 14:30 IST

ज्यांच्या शिफ्टस सतत बदलतात त्यांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.

नवी दिल्ली- भारतासह जगभरातील विविध देशांतील तज्ज्ञांनी नाइटशिफ्टमुळे लठ्ठपणा, मधुमेह वाढण्याचा धोका जास्त असतो आणि त्यामुळे कर्करोग, हृदयरोग होण्याचा धोका वाढतो असे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या सर्व शरीरासाठीचे नियंत्रण करणारे एकच बॉडी क्लॉक मेंदूमध्ये असते असा आजवरचा समज आहे. मात्र वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या समजाला छेद जाईल असा अभ्यास केला आहे. त्यांच्यामते यकृत, स्वादुपिंड अशा अवयवांचं स्वतःचं असं वेगळं क्लॉक असतं.या विद्यापिठातील हॅन्स वॅन डोंजेन याबाबत बोलताना म्हणाले, लोकांच्या पोटातील पचनक्रिया करणाऱ्या अवयवांच्या घड्याळाबाबत कोणालाच नीट माहिती नाही. कामाच्या पाळ्यांमध्ये अचानक होणारे बदल मेंदूलाही स्वीकारणं कठिण जात असतं. त्यामुळे शरीरातील काही अवयव आता दिवस आहे असा संकेत देत असतात तर काही अवयव आता रात्र आहे असा दुसरा वेगळा संकेत देत राहातात. त्यामुळे चयापचयावर परिणाम होतो. कामाच्या वेळांमध्ये होणारा बदल तसेच मूत्रपिंडाचे आजार यांच्यामधील संबंध स्पष्ट करणारा आमचा हा पहिलाच अभ्यास असावा. असं या विद्यापिठातील शोभन गड्डेमिढी हे प्राध्यापक म्हणतात. या अभ्यासामध्ये शिफ्टमध्ये काम करणाऱे लोक मूत्रपिंडाचा कर्करोग, त्वचेचा व प्रोस्टेटग्रंथीचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पेशींसंबंधी प्रक्रीयेचा चयापचयाशी संबंध असतो. त्यामुळे चयापचय बिघडलेल्या शिफ्ट कामगारांना पुढील काळामध्ये कर्करोगाचा धोका असतो असे गड्डेमढी म्हणाले. जर त्या पेशीसंबंधी प्रक्रीयेला समजून घेता आले तर त्यात समाविष्ट जीन्सना शोधता येईल व त्याचा उपयोग कर्करोग थांबविण्यासाठी उपचारात करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHeart Attackहृदयविकाराचा झटकाcancerकर्करोग