शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:43 IST

'व्हॅलेंटाइन डे'ला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं?  त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा.

- गीता खेडेकर

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमवीरांच्या, प्रियकर-प्रेयसीच्या हक्काचा दिवस. या प्रेमदिनी, म्हणजेच १४ फेब्रुवारीला आजूबाजूला  प्रेमाचा लाल रंग खुलून आलेला दिसतो. एखाद्याने 'व्हॅलेंटाईन डे'ला लाल रंगाचे कपडे घातले की, ती किंवा तो 'कमिटेड' आहेत किंवा 'डेट'वर आहे हे लगेच आपल्याला समजतं. पण, या दिवसाला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं?  त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा.

ट्विनिंग-कधी कधी योगायोगाने आपला ड्रेस कोणासोबत मॅचिंग झाला तर आपण 'इंच का पिंच' किंवा 'सेम टू सेम' असं म्हणतो. यालाच ट्विनिंग ड्रेस असं म्हणतात. यात तुम्ही एकसारखी प्रिंट, रंगाचे कपडे घालू शकता. कपड्यांपासून चपलेपर्यंत तुम्ही मॅच अप करू शकता.  ट्विनिंग स्टाइल करताना अगदी सेम टू सेम कपडे असल्यास उत्तम. 

कपल टीशर्ट-कपल टीशर्ट दिसायला अगदीच नेहमीच्या टी-शर्टसारखे असतात . फक्त यावर कपल्सशी संबंधित कोट्स लिहलेले असतात, ते अर्धे-अर्धे. दोन्ही टीशर्ट्स बाजूबाजूला असल्याशिवाय त्यावरील मेसेज पूर्ण होत नाही. यात कोट्सशिवाय ईमोजीही असतात. उदा. प्रिन्स-प्रिन्सेस, शी इज माईन-ही इज माईन वैगरे. बाजारात अनेक रेडिमेड कपल टीशर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुम्हाला हवे असलेले मेसेजेस लिहून कस्टमाइज टीशर्ट्सही ऑर्डर करू शकता. 

कपल अॅक्सेसरीज -तुम्हाला तुमचं रिलेशनशिप स्टेट्स लपवून ठेवायचं असेल किंवा सिक्रेट डेटला जायचा प्लॅन असेल तर मग कपल ऍक्सेसरीज हा मस्त पर्याय आहे. यात पेंडेंट, फिंगर रिंग, ब्रेसलेट घड्याळ, मोबाइल कव्हर्स यांसारख्या सहजासहजी न कळणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

जॅकेट स्टाईल-ट्विनिंग किंवा कपल टीशर्टला हटके व्रीस्ट कोट, जीन्स किंवा बॉम्बर जॅकेट त्यावर घाला. हल्ली सहजतेने ही जॅकेट्स बाजारात मिळतात. जॅकेट्स घेताना गडद-फिकट अशी कॉन्ट्रास्ट रंगसंगती निवडा.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकrelationshipरिलेशनशिपfashionफॅशन