शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

या 7 प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 13:18 IST

प्रेमात पडण्याअगोदर किंवा लग्नाचा विचार करण्याअगोदर काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे.

ब-याचदा केवळ सुरुवातीच्या आकर्षणामुळे दोन व्यक्ती ऐकमेकांच्या प्रेमात पडतात. लग्नही करतात. पण कालांतराने दोघांमध्ये खटके उडायला लागतात. त्यामुळे प्रेमात पडण्याअगोदर किंवा लग्नाचा विचार करण्याअगोदर काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या मुलाला डेट करत असाल तर त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही डेट करत असलेल्या व्यक्तीच्या खालील 7 सवयींकडे नक्की लक्ष द्या...यात फायदा तुमचाच...

१) नॅरो माईंडनेस

जी व्यक्ती तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. ती व्यक्ती कायम तुमच्यावर या ना त्या कारणाने बंधनं लादत असतात. सतत तुमच्यावर संशय घेत असतात, तर या नात्याबाबत तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ती व्यक्ती तुमच्यासोबत किती एकनिष्ठ आहे हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. खरंतर अशा व्यक्तीमुळे तुम्हाला सुख मिळण्याऐवजी त्रासच जास्त होण्याची शक्यता अधिक असू शकते. 

2) मनमानी करणारा/करणारी

काही लोकं अशी असतात जी सतत 'मेरीच गीनो' अशा अविर्भावात वागत असतात. दोघांनी मिळून तयार झालेलं हे नातं तो त्याच्याच नियमांनी हाकत असतो. अशावेळी  दोघांपैकी एकाची कुचंबना होण्याची जास्त शक्यता असते. प्रत्येक नात्यांत काही बेसिक अलिखित नियम असतात. हे नियम पाळले गेले नाही तर भांडणं वाढतात. 

3) स्त्रियांचा आदर

जी व्यक्ती स्त्रियांचा आदर करत नसेल तर मग काय बोलायचं? तुमच्या आयुष्यातील व्यक्ती जर तुमचा आदरच करत नसेल आणि तुम्हाला सतत दुय्यम लेखत असेल तर त्या नात्याला काय अर्थ? कोणत्याही नात्यात ऐकमेकांचां आदर करणं महत्वाचं असतं.

 4) विचार आणि भावनांचा आदर

कोणत्याही नात्यात तुमचे विचार आणि भावना जपणंही तितकंच महत्वाचं आहे. जर हे होत नसेल तर त्याला खरंच प्रेम म्हणता येईल का? असा प्रश्न उभा ठाकतो. जर तुमच्या विचारांचा आणि भावनांचा आदर होत असेल, तरच तुम्ही योग्य व्यक्तीसोबत आहात असे समजा.

5) सतत विनाकारण भांडणारी व्यक्ती

प्रेमाच्या नात्यात भांडणातही एक गोडवा असतो. पण ते भांडण फार काळ असू नये. भांडण हा प्रेमाचाच एक भाग आहे. पण काहीव्यक्ती विनाकारण उगाच काहीतरी कारण शोधून सतत भांडत असतात. काही कारण असल्यावर भांडण केल्यास एकवेळ ठिक. पण उगाच भांडण केल्याने तुमचा मनस्ताप अधिक वाढण्याची शक्यता आहे.

6) खोटं बोलून फसवणारी व्यक्ती

ते म्हणतात ना की, एखादं खोटं बोलल्याने कुणाचं नुकसान होत नसेल तर ते खोटं एकवेळ चालून जातं. पण एखादी व्यक्ती सतत खोट्याचा आधार घेऊन तुमची फसवणूक करत असेल तर हे अडचणीचं ठरु शकतं. एक खोटं बोलायला दुसरं खोटं आणि दुसरं खोट बोलायला तिसरं. अशावेळी नात्यामध्ये फक्त दुरावा निर्माण होतो. जर ती व्यक्ती नातं तोडण्यासाठी हेच कारण असेल तर खरचं याचा विचार करा.

7) खाजगी स्पेस 

प्रत्येक नात्यात दोघांनीही एकमेकांना खाजगी स्पेस देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला खाजगी आयुष्य आहे. याचं भान ठेवून स्वतंत्र आयुष्य जगण्यास मदत करणं गरजेचं आहे. पण ते होत नसेल तर विचार करावा.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप