शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

तुमच्या घरातल्या पुस्तकांच्या लायब्ररीची कशी काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 16:51 IST

आपण पुस्तके विकत घेतो किंवा लायब्ररीतून घरी आणतो मात्र ती ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करत नाही. यामुळे पुस्तके हरवणे, फाटणे किंवा कोणीतरी उचलून नेणे असे प्रकार होतात.

मुंबई- असं म्हणतात की तेल, पाणी आणि अपात्र व्यक्तीपासून पुस्तकांना नेहमीच जपलं पाहिजे. हे वाक्य पूर्ण खरे असले तरी पुस्तकांच्या बाबतीत अधिक काळजी करण्याचे अनेक मुद्दे आहेत. आपण पुस्तके विकत घेतो किंवा लायब्ररीतून घरी आणतो मात्र ती ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करत नाही. यामुळे पुस्तके हरवणे, फाटणे किंवा कोणीतरी उचलून नेणे असे प्रकार होतात. पुस्तकं योग्य प्रकारे ठेवणे हे आपल्या घरातला एक महत्त्वाचा भाग आहे.पुस्तकं ठेवावी कशी?पुस्तकं कशी ठेवली आहेत यावरही तुमचे वाचन अवलंबून असते. पुस्तके आकारानुसार, त्यांच्या विषयानुसार किंवा रंगानुसार ठेवता येतात. लहान मुलांची पुस्तके वेगळी, इतरांनी वाचायची पुस्तके वेगळी. धार्मिक पुस्तके वेगळी असे कप्पे करता येतील. पुस्तकांची काही महिन्यांनंतर जागा बदलणेही वाचनासाठी चांगले असते. त्यामुळे मागे पडलेली किंवा तुमच्या नजरेच्या आड गेलेली पुस्तके समोर येतील आणि त्या पुस्तकांचेही वाचन होईल.

जुन्या पुस्तकांचे काय करावे?तुमच्याकडे जुनी आणि दुर्मिळ पुस्तके असतील तर ती पुस्तकं वेगळ्या कप्प्यामध्ये काचेच्या आढ ठेवावीत. त्यांच्यावर सूर्यप्रकाश थेट पडणार नाही तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे कसर लागणार नाही, पाणी लागणार नाही याची काळऴजी घ्या. तुमच्या पुस्तकांची जागा ओलसर, कुबट, दमट जागी कधीही असू नये.

धूळ आणि स्वच्छतेचे काय ?घरामध्ये रद्दी, कागद किंवा पुस्तके असल्यास त्यावर धूळ साठल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पुस्तकांची काळजी घेण्यासाठी ही धूळ वेळोवेळी साफ करणं हे तुमचं काम आहे. जर तुम्ही पुस्तकं बेडरुममध्ये ठेवलीत त्यांची काळजी जास्त घ्यावी लागेल. पुस्तके शक्यतो बेडरुममध्ये ठेवू नयेत. ठेवल्यास ती कपाटात बंद ठेवावीत आणि त्यांच्यावरील धूळ वेळोवेळी साफ करावी. अस्थम्याचे रुग्ण घरात असतील तर धूळ साठणार नाही याची जास्त काळजी घ्यावी.

टॅग्स :Homeघर