शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:23 IST

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी एफआयआर दाखल केली आहे.

मुंबई:भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी आज शिवसेना युवासेनेचे सचिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वरुण सरदेसाई यांच्यावर मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राणेंच्या वक्तव्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या विविध आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी भाजप कार्यालयाची तोडफोड आणि भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आंदोलनावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. 

भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी एका निवेदनात म्हटलं की, पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. आता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या वरुण सरदेसाईंविरोधातही एफआयआर दाखल करावा. तसेच, वरुण सरदेसाई यांच्यावर कारवाई न केल्यास भाजयुमोनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नेमकं काय झालं ?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणेंनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यात शिवसेनेनं थेट नारायण राणेंच्या घराबाहेर आंदोलन केल्यानं संघर्ष आणखी वाढला. युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राणे यांच्या घराबाहेर भाजपाचे कार्यकर्तेही होते. तेव्हा दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. राणे यांच्या घराबाहेर पोलिसांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त वाढवला. परंतु यावेळी झालेल्या झटापटीत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झाले. 

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे