शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:05 IST

घरात कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या जातात. तरीही कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात.

(image credit-www.bcvm.org)

पावसाळा आला की सगळ्यात जास्त डोक्याला तात म्हणजे कपडे सुकवण्याचा. पावसाच्या वातावरणामुळे कपडे वेळेवर सुकले नाही तर गैरसोयीचा सामना करावा लागतो.  पाऊस कधीही येण्याची शक्यता असते. म्हणून अनेक घरांमध्ये पावसाळा आला की घरात कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या जातात. तरीही कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी  आम्ही तुम्हाला कपडे सुकवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही झटपट कपडे सुकवू शकता.

सध्या कोरोनामुळे सगळ्यांनचाच घरी वस्तू किंवा कपडे धुवून स्वच्छ करण्याचं प्रमाण वाढं आहे. कारण  कोरोना विषाणू कपड्यांवरही असल्यास संक्रमणाचं कारण ठरू शकतो. म्हणून बाहेरून आल्या आल्या लोकं कपडे धुवायला टाकत आहेत.  जसे कपडे धुतले जातात. त्याच प्रमाणे कपडे सुकणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला या टीप्सच्या मदतीने संपूर्ण पावसाळा चांगला जाऊ शकतो. 

(image credit-Bobvila)

कपडे घट्ट पिळणं महत्वाचं 

कपडे वाळण्यासाठी पाणी निथळायला हवं. कारण त्यात पाणी असेल तर वाळणे मुश्किल होते. अशावेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले असतील तर दोनवेळा  ड्राय मोडवर फिरवून घ्यावेत. हाताने धुतले असतील तर वाळत घालण्याआधी उंच जागी ठेवून निथळून घ्या आणि शक्यतो जमेल इतके पिळून, झटकून वाळत घाला. 

हँगरचा वापर करा 

कपडे खूप असतात आणि जागा कमी असते त्यावेळी हँगर वापरता येतील.विशेषत: छोटे कपडे आणि अंतर्वस्त्र हँगरला टांगून अडकवता येतील. यामुळे त्यांची जागा मोठ्या कपड्यांना वापरायला मिळते. कपडे ९० टक्के वाळले असतील तर ते घरात वाळवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. अशावेळी ते कपडे हँगरला लावून फॅनखाली ठेवा. मात्र ते ९० टक्के वाळलेले असतील तरच आत आणा. ज्या खोलीत कपडे वाळत घातले आहेत त्या सर्व खिडक्या, दारे उघडी ठेवा. त्यामुळे हवा खेळती राहील. 

कपड्यांना येणारा दुर्गंध टाळण्यासाठी

अनेकदा ओलसर कपडे जागेच्या अभावी घडी करून कपाटात ठेवले जातात किंवा कपडे खोलीत वाळत घातल्यास त्यांना कुबट वास येतो. अशावेळी कपडे असणाऱ्या खोलीत धूप लावून एका बाजूला ठेवा. त्यामुळे कपड्यांना सुगंध येत राहील. मात्र धूप कपड्यांजवळ लावू नका. त्यामुळे आगीसारखी दुर्घटना घडू शकते. 

तुम्हालाही अपचनामुळे आंबट ढेकर येतात का? 'या' सोप्या घरगुती उपायांनी समस्या होईल दूर

Coronavirus : कोरोनाला मात देण्यासाठी नवी रणनीति Serological Survey, वाचा काय आहे हा सर्व्हे...

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशल