'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:59 PM2020-06-22T14:59:23+5:302020-06-22T15:05:53+5:30

घरात कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या जातात. तरीही कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात.

Easy Idea for drying clothes in the rainy season! | 'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

Next

(image credit-www.bcvm.org)

पावसाळा आला की सगळ्यात जास्त डोक्याला तात म्हणजे कपडे सुकवण्याचा. पावसाच्या वातावरणामुळे कपडे वेळेवर सुकले नाही तर गैरसोयीचा सामना करावा लागतो.  पाऊस कधीही येण्याची शक्यता असते. म्हणून अनेक घरांमध्ये पावसाळा आला की घरात कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधल्या जातात. तरीही कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी  आम्ही तुम्हाला कपडे सुकवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही झटपट कपडे सुकवू शकता.

सध्या कोरोनामुळे सगळ्यांनचाच घरी वस्तू किंवा कपडे धुवून स्वच्छ करण्याचं प्रमाण वाढं आहे. कारण  कोरोना विषाणू कपड्यांवरही असल्यास संक्रमणाचं कारण ठरू शकतो. म्हणून बाहेरून आल्या आल्या लोकं कपडे धुवायला टाकत आहेत.  जसे कपडे धुतले जातात. त्याच प्रमाणे कपडे सुकणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला या टीप्सच्या मदतीने संपूर्ण पावसाळा चांगला जाऊ शकतो. 


(image credit-Bobvila)

कपडे घट्ट पिळणं महत्वाचं 

कपडे वाळण्यासाठी पाणी निथळायला हवं. कारण त्यात पाणी असेल तर वाळणे मुश्किल होते. अशावेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले असतील तर दोनवेळा  ड्राय मोडवर फिरवून घ्यावेत. हाताने धुतले असतील तर वाळत घालण्याआधी उंच जागी ठेवून निथळून घ्या आणि शक्यतो जमेल इतके पिळून, झटकून वाळत घाला. 

हँगरचा वापर करा 

कपडे खूप असतात आणि जागा कमी असते त्यावेळी हँगर वापरता येतील.विशेषत: छोटे कपडे आणि अंतर्वस्त्र हँगरला टांगून अडकवता येतील. यामुळे त्यांची जागा मोठ्या कपड्यांना वापरायला मिळते. 
कपडे ९० टक्के वाळले असतील तर ते घरात वाळवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. अशावेळी ते कपडे हँगरला लावून फॅनखाली ठेवा. मात्र ते ९० टक्के वाळलेले असतील तरच आत आणा. ज्या खोलीत कपडे वाळत घातले आहेत त्या सर्व खिडक्या, दारे उघडी ठेवा. त्यामुळे हवा खेळती राहील. 

Use Idea for drying clothes in the rainy season! | पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी वापरा या आयडिया !

कपड्यांना येणारा दुर्गंध टाळण्यासाठी

अनेकदा ओलसर कपडे जागेच्या अभावी घडी करून कपाटात ठेवले जातात किंवा कपडे खोलीत वाळत घातल्यास त्यांना कुबट वास येतो. अशावेळी कपडे असणाऱ्या खोलीत धूप लावून एका बाजूला ठेवा. त्यामुळे कपड्यांना सुगंध येत राहील. मात्र धूप कपड्यांजवळ लावू नका. त्यामुळे आगीसारखी दुर्घटना घडू शकते. 

तुम्हालाही अपचनामुळे आंबट ढेकर येतात का? 'या' सोप्या घरगुती उपायांनी समस्या होईल दूर

Coronavirus : कोरोनाला मात देण्यासाठी नवी रणनीति Serological Survey, वाचा काय आहे हा सर्व्हे...

Web Title: Easy Idea for drying clothes in the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.