शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तुमचे बॉडी टाइम तुम्हाला माहिती आहे का? 

By अोंकार करंबेळकर | Updated: September 27, 2018 17:13 IST

प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क  हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. 

लंडन-आपल्या हातातलं घड्याळ जी वेळ दाखवतंय तीच आपली वेळ असा समज असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. तुमच्या शरीराच्या आत असलेल्या घड्याळाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आता शास्त्रज्ञांनी केवळ रक्ताच्या चाचणीवरुन आपल्या इंटर्नल क्लॉकची वेळ सांगू शकतो असा दावा केला आहे. यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी टाइम सिग्नेचर चाचणीद्वारे साधारणपणे डझनभर जनुकांद्वारे व्यक्तीच्या सिर्काडियन रिदमचा उलगडा करता येतो असे सांगितले. सिर्काडियन रिदम ही एक प्रक्रिया असून यामध्ये शरीर व मेंदूचे झोपेतील व जागेपणीचे चक्र असते. प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क  हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. १२ तासाच्या अंतराने घेतलेले रक्ताचे दोन नमुने तुमच्या अंतर्गत घड्याळाबद्दल ठोस भाष्य करु शकतात असे या संशोधनाच्या प्रमुख रोजमेरी ब्राऊन यांनी सांगतिले आहे. रक्तामधील ४० जनुकांचे परीक्षण करुन व्यक्तीच्या शारीरिक घड्याळाची माहिती दीड तासामध्ये आपण देऊ शकतो असे त्या म्हणाल्या. त्या शिकागोतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिन प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन विष़याच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत. केवळ निद्रानाशच नव्हे तर इतर अनेक आजारांमध्ये औषध देण्यास रुग्णाची शारीरिक वेळ समजल्यास मदत होणार आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास कोलेस्ट्रॉल कमी कमी करणारे स्टॅटीन औषध रुग्ण साधारणत: झोपेच्या तयारीत असताना चांगल्या पद्धतीने काम करते कारण ते रोखत असलेले एन्झाइम संध्याकाळी जास्त कार्यरत असते, अशी माहिती डॉ. वू यांनी दिली. कर्करोगासाठी किमोथेरपीही दिवसातील ठराविक वेळेस दिल्यास अधिक परिणामकारक ठरते.प्रत्येकाचे शारीरिक घड्याळ सर्व अवयवांची हालचाल आणि कार्यपद्धती ठरवत असते. त्यामुळे नाइटशिफ्ट करणाºया किंवा दूरवर विमानप्रवास करुन जाणाऱ्या लोकांच्या शरीराची वेळ आणि बाहेरच्या जगातील वेळ जुळत नाही. त्यामुळे त्यांना त्रासही होतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स