जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पथकाची जोगाळ्याला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST2021-03-14T04:19:11+5:302021-03-14T04:19:11+5:30
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जोगाळा येथे आर.आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत गाव विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये ...

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पथकाची जोगाळ्याला भेट
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जोगाळा येथे आर.आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत गाव विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये घर तेथे शोषखड्डा, अंगणवाडीची रंगरंगोटी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड, गाव स्वच्छता, सार्वजनिक शौचालय, घरकुल बांधकाम, सुंदर माझे गाव योजनेंतर्गत गावातील सर्व शासकीय इमारतीची रंगरंगोटी आदी सर्व कामाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य लेखाधिकारी जवळगेकर, अभियंता बाळासाहेब शेलार, आरोग्याधिकारी सूर्यकांत परगे, चोले, जिल्हा कृषी अधिकारी चोले, गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, प्रदीप बौंबले, दिनकर व्होट्टे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच कामकाजाबाबत कांही सूचनाही दिल्या आहेत.
पशुधनासाठी पाणवठ्याची सोय...
‘सुंदर माझे गाव पुरस्कार’ योजनेंतर्गत गावातील विविध शासकीय इमारत, शाळा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे पशुधनाची सोय व्हावी म्हणून पाणी पिण्यासाठी जागोजागी पाणवठ्याची सोय करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी समाधान व्यक्त केले.