कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:50+5:302021-04-05T04:17:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या ही काळजी वाढविणारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या ही काळजी वाढविणारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहून प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, कुठल्याही रुग्णांची गैरसोय होऊ देऊ नये, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी रविवारी केल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, योगा, प्राणायाम शिबिर व आवश्यक ते प्रमाणित संदर्भ सेवा दिल्या जाव्यात. जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, सर्वच केंद्रांमध्ये पाच ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.