युगंधर गरडचे मूल्यशिक्षण परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:06+5:302021-02-26T04:26:06+5:30
यशवंत विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम लातूर : येथील यशवंत विद्यालयात पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवा गृहऊर्जा ...

युगंधर गरडचे मूल्यशिक्षण परीक्षेत यश
यशवंत विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम
लातूर : येथील यशवंत विद्यालयात पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवा गृहऊर्जा प्रबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केदार खमितकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, संस्थेचे संचालक आनंदराव माने, ई.जी. दुरुगकर, किरण खमितकर, शिवाजी हांडे, लालासाहेब रावळे, दिलीप कानगुले यांची उपस्थिती होती. ‘हरित व स्वच्छ ऊर्जा’ या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
राजेंद्र बोकन यांची उपाध्यक्षपदी निवड
लातूर : भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र बोकन यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अरविंद पाटील निलंगेकर, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, स्वातीताई जाधव, दीपक मठपती, भरत चव्हाण, गोरख सारगे, अर्जुन माने, दुर्गेश चव्हाण, गणेश पवार, योगेश गंगणे आदींनी कौतुक केले आहे.
निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
लातूर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातील १९ वर्षांच्या आतील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दयानंद शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या निवडीकरिता १ सप्टेंबर २००२ नंतरचा जन्म असलेले खेळाडू पात्र असतील. सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव प्रा. भारत चामले यांनी केले आहे.
नरसिंग वाघमोडे यांना पीएच.डी. प्रदान
लातूर : येथील यशवंत विद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक नरसिंग सोपानराव वाघमोडे यांना स्वारातीम विद्यापीठाच्यावतीने मराठी विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. बालाजी डिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोधप्रबंध सादर केला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, डॉ.पी.आर. देशमुख, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, आनंदराव माने, डॉ. प्रभाकर गळेगावकर, डॉ. रेखा गळेगावकर, डॉ. सिद्राम कठारे, डॉ. शिवाजी जवळगेकर, डॉ. शंकरानंद येडले, डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. चंद्रकांत शेरखाने आदींनी कौतुक केले आहे.
अखिल भारतीय युवा मित्र मंडळाचे निवेदन
लातूर : येथील शासकीय दवाखान्यात मनोरुग्णांसाठी गोळ्या उपलब्ध करून द्याव्यात, तसेच अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी मनोरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अखिल भारतीय युवा मित्र मंडळाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर दयानंद सिरसाठे, प्रदीप कांबळे, विशाल कांबळे, आनंद लातूरकर, डॉ. अरुण कांबळे, गौतम कांबळे, संजय घुगे, मिलिंद बानाटे, राजू वाघमारे, दीपक साबणे, संजय पाडुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिवाजी कोंडमगिरे यांचा निवडीबद्दल सत्कार
लातूर : जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रसिद्धी प्रमुखपदी शिवाजी कोंडमगिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. गणपतराव माने, धर्मपाल गायकवाड, प्रा. मनोज रेड्डी, प्रा. शरद माने, प्रा. शंकर बुड्डे यांची उपस्थिती होती. शिवाजी कोंडमगिरे राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाचे नाट्य कलावंत असून, कबड्डी पंच, तसेच राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
लातूर : महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जतन करा पावसाच्या प्रत्येक थेंबाचे’ या विषयावर स्पर्धा होणार असून, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, साक्षी समय्या, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई, संजय ममदापुरे आदींनी केले आहे.
‘दयानंद कला’मध्ये अभिवादन कार्यक्रम
लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी संत गाडगेबाबांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. शिवाजीराव जवळगेकर, डॉ. सुनील साळुंके, डॉ. अंजली जोशी, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. सुनीता सांगोले, डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. संतोष पाटील, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, डॉ. नितीन डोके, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. सुधीर गाढवे, प्रा. महेश जंगापल्ले, नवनाथ भालेराव यांची उपस्थिती होती.
सागर माने याचे विद्यापीठ परीक्षेत यश
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत समाजकार्य विभागातील सागर पांडुरंग माने याने गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहंमद पठाण, पृथ्वीराज राठोड, सत्यवान धुमाळ, शाहुराज हाके, श्रीधर साळुंके, रविता कांबळे, हर्षदा बेडगे यांची उपस्थिती होती. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असल्याचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी सांगितले.
सहकारी साहित्य मुद्रणालय संस्थेस संगणक
लातूर : जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय या संस्थेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते संगणक व प्रिंटर भेट देण्यात आले. यावेळी चेअरमन ॲड. श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, ॲड. विश्वंभरराव माने, अशोकराव पाटील निलंगेकर, यशवंतराव पाटील, भगवानराव पाटील, ॲड. प्रमोद जाधव, नाथसिंह देशमुख, संभाजीराव सूळ, एन.आर. पाटील, धर्मपाल देवशेट्टे, व्यंकटराव बिरादार, सुधाकर रुकमे, संजय बोरा, शिवकन्या पिंपळे, स्वयंप्रभा पाटील, हणमंत जाधव आदींची उपस्थिती होती.