शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात युवकाचा दगडाने ठेचून खून; १२ तासात आराेपीला ठाेकल्या बेड्या

By राजकुमार जोंधळे | Updated: March 24, 2025 19:39 IST

आरोपी ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला.

लातूर : २४ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना साेमवारी पहाटे लातुरातील श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या संकूल परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खुनातील आराेपीला अवघ्या बारा तासात पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत.

पाेलिसांनी सांगितले, अक्षय उर्फ आकाश राम तेलंगे (रा. गाेपाळनगर, लातूर) हा नेहमीप्रमाणे श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या काेपऱ्यावरील संकुलात रविवारी रात्री मुक्कामी हाेता. ताे दिवसभर शहरात भटकत हाेता अन् रात्री संकुलाच्या गॅलरीत झाेपत हाेता. दरम्यान, क्वाईल नगर भागातील अक्षय उर्फ भुऱ्या गणपती अंकुशे (२७) याने साेमवारी पहाटे त्याच्या डाेक्यात दगड घातला. त्याची ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला. सकाळी ८:३० वाजता परिसरातील वाहनतळावर आलेल्या चालक, नागरिकांना घटना समजली. यानंतर त्यांनी शिवाजीनगर ठाण्याला कळविले. घटनास्थळी लातूरचे डीवायएसपी रणजीत सावंत, पाे.नि. दिलीप सागर यांनी भेट दिली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात मयताची बहिण गीता अतुल वरटे (२७, रा. पानचिंचाेली ता. निलंगा) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही अन् खबऱ्याची टीप; एक आराेपी जाळ्यात...गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी खबऱ्यांची मदत घेतली. सीसीटीव्ही, खबऱ्याच्या माहितीनंतर आराेपीचा शाेध लागला. क्वाईल नगरमधून आराेपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. - दिलीप सागर, पाेलिस निरीक्षक

अक्षय तेलंगेवर विविध ठाण्यात गुन्हे...जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात अक्षय उर्फ आकाश तेलंगे याच्याविराेधात विविध गुन्ह्यांची पाेलिस दप्तरी नाेंद आहे. लातुरातील विवेकानंद चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चाैक, लातूर ग्रामीण आणि औसा ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.

एक वर्षासाठी केले हाेते तडीपार...टोळी तयार करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अक्षय उर्फ आकाश तेलंगे याच्यासह इतरांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार केले हाेते. याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी १७ मार्च २०२५ राेजी जारी केले हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर