दापक्याळ ग्रामपंचायतीवर आपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:11+5:302021-01-19T04:22:11+5:30

आम आदमी पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांंनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे. या ग्रामपंचातीच्या सात सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. ...

Your flag on Dapkyal Gram Panchayat | दापक्याळ ग्रामपंचायतीवर आपचा झेंडा

दापक्याळ ग्रामपंचायतीवर आपचा झेंडा

आम आदमी पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांंनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे. या ग्रामपंचातीच्या सात सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. सोमवारी मतमोजणी झाली. त्यात संपूर्ण निर्मल परिवर्तन आम आदमी पॅनलचे पाच उमेदवारी बहुमताने विजयी होवून ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. विजयी उमदेवारांमध्ये उर्मिला भोसले, संतोष कासले, पूजा पाटील, कलिमून शेख , आणि शंकर कांबळे यांचा समावेश आहे.

दरम्यान,या विजयाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,महाराष्ट्र आप संयोजक रंगा राचूरे, सचिव धनंजय शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष इंजि.अजिंक्य शिंदे आदिंनी अभिनदन केले आहे.

जनतेने भ्रष्टाचाराला ठोकर मारुन समतावादी विचारांच्या नवीन चेहर्‍यांना, गावचा विकास साधण्यासाठी विजयी केले आहे. त्याचा आदर ठेवत गावचा विकास साधू असे प्रताप भोसले यांनी सांगितले.

Web Title: Your flag on Dapkyal Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.