घरगुती वापराच्या सिलिंडरवर मिळतेय ८ रूपयांची सबसिडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:56+5:302020-12-04T04:58:56+5:30
घोषणा न करताच अनुदान घटविले... केंद्र शासनाने सिलिंडरवर अनुदान देत असताना घोषणा केली होती, त्यानुसार लाखो ग्राहकांनी बँकेत रक्कम ...

घरगुती वापराच्या सिलिंडरवर मिळतेय ८ रूपयांची सबसिडी
घोषणा न करताच अनुदान घटविले...
केंद्र शासनाने सिलिंडरवर अनुदान देत असताना घोषणा केली होती, त्यानुसार लाखो ग्राहकांनी बँकेत रक्कम जमा होणार असल्याने खातेही काढून घेतली. मात्र, मागील काही महिन्यांपासून खात्यावर येणारे अनुदान निव्वळ हास्यास्पद असून शासनाने सबसिडीच बंद केली काय,अशी चर्चा आहे. घरगुती सिलिंडरची किंमत १०० ते १४० रूपये घटविण्यात आली असली तरी अनुदानाची रक्कम तुटपुंजी येत असल्याने ग्राहकही चक्रावले आहेत.
घरपोच सेवेसाठी अधिकचे शुल्क...
ग्राहकांना घरपाेच सिलिंडर देण्यासाठी काही भागात १० ते २० रूपये घेतले जातात. शहरी भागातून जोडणी घेतलेल्या ग्राहकांना घरपोच सेवा महागात पडत आहे. संबंधित कंपनीचे वाहन आले तर २० ते ३० रूपये घेतले जातात. खाजगी वाहनांतून मात्र, ४० ते ५० रूपये मोजावे लागत आहेत.
रक्कम वाढायला हवी...
सिलिंडरचे अनुदान पूर्वीप्रमाणे मिळायला हवे. किंमत कमी दाखवून अनुदानाची रक्कमच बंद केल्याचे दिसून येत आहे. अगोदर किंमत वाढविली आता किंमत कमी केल्याचे सांगून अनुदान बंद केले . सुनंदा माने