माळेगाव (खु.) येथे योग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:20+5:302021-06-20T04:15:20+5:30
चाकुरात बांधकाम साहित्याची चोरी लातूर : मंगल कार्यालय परिसरातून बांधकाम साहित्याची चोरी झाल्याची घटना चाकूर येथे १२ ते १३ ...

माळेगाव (खु.) येथे योग शिबिर
चाकुरात बांधकाम साहित्याची चोरी
लातूर : मंगल कार्यालय परिसरातून बांधकाम साहित्याची चोरी झाल्याची घटना चाकूर येथे १२ ते १३ जूनच्या दरम्यान घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले शादुल अजमसाब शेख (३५, रा. चाकूर) यांचे चाकूर येथील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालय परिसरातून ६० लोखंडी प्लेट, ५ लोखंडी स्पॅन, १० लोखंडी दांड्या, ३० प्लायवूडचा नग आणि जुने सेट्रिंग साहित्य असा एकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत चाकूर पोलिसात गुरुवारी गुन्हा नोंद केला आहे.
उदगीर शहरातून दुचाकीची चोरी
लातूर : उदगीर येथील एका दुकानासमोर थांबविलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना १४ जून रोजी घडली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी संतोष गंगाधर सुरवसे (२८, रा. राचन्नावाडी, ता. चाकूर) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच २४ एएम १९२३) उदगीर शहरातील मोंढा रोड परिसरात असलेल्या एका दुकानासमोर थांबविली होती. दरम्यान, ती अज्ञात चोरट्यांनी पळविली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.