समर्पित संस्थेच्या वतीने योग शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:36+5:302021-05-22T04:18:36+5:30
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा लातूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र काहीजण विनाकारण फिरत ...

समर्पित संस्थेच्या वतीने योग शिबीर
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
लातूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र काहीजण विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या वतीने विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांत पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत ७९ हजार ९३७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तत्काळ चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत आहे. नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्याच्या तापमानात झाली वाढ
लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कडक उन्ह पडत असून, दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिल्ह्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेकजण शेतशिवारात झाडांचा आसरा घेत आहेत, तर शहरातील नागरिक दुपारच्या वेळी पंखे, कुलरचा आधार घेत उकाड्यापासून सुटका करून घेत आहेत.
बंद सिग्नल सुरू करण्याची मागणी
लातूर : शहरातील पाच नंबर चौक, दयानंद गेट परिसरातील वाहतूक सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. सायंकाळच्या वेळी तर रात्री ८ नंतर चौकात वाहतूक पोलीस नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. एमआयडीसी परिसर असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सिग्नलअभावी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देऊन बंद असलेले सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.