उस्तुरीतील यात्रा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:43+5:302021-04-11T04:19:43+5:30
करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे श्री नागनाथेश्वरांचे हेमाडपंती मंदिर आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला पाच दिवस ...

उस्तुरीतील यात्रा उत्सव रद्द
करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे.
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे श्री नागनाथेश्वरांचे हेमाडपंती मंदिर आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला पाच दिवस विविध धार्मिक कार्ये पार पडतात. तसेच पशुप्रदर्शन, भारूड, पालखी मिरवणूक, नाटक, अग्निपूजन, शोभेचे दारूकाम, जंगी कुस्त्या होतात. या कालावधीत परिसर व कर्नाटक सीमा भागातील भाविक यात्रेस येतात. परंतु, यंदा कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. त्यामुळे हे सर्व कार्यक्रम होणार नाही. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे यात्रेनिमित्त १४ एप्रिल रोजी येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
...
फिजिकल डिस्टन्सकडे नागरिकांचे दुर्लक्ष
निलंगा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मास्कचा वापर करावा. तसेच फिजिकल डिस्टन्स राखावा, असे आवाहन करीत आहे. मात्र, त्याकडे बहुतांश नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गल्लीबोळात युवक रस्त्यावर बसून मोबाइलवर गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. कोणी विचारणा केली असता हे युवक अपमानित करीत असतात.
...
काटेरी झुडुपांमुळे अपघाताची भीती
जळकोट : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांनजीकची काटेरी झुडुपे वाढली आहेत. या झुडुपांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन वळणाच्या ठिकाणी अनेकदा अंदाज येत नसल्याने डोळ्यांस फांद्या लागत आहेत. त्यामुळे इजा होत आहे. नवीन वाहनधारकांना तर कसरतच करावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन फांद्या तोडाव्यात, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.