कु-हाडीने मारून केले जखमी; तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:25+5:302021-08-14T04:24:25+5:30
महानगरपालिका परिसरातून दुचाकी लंपास लातूर : महानगरपालिकेच्या बाजूच्या रोडच्या कडेला पार्किंग केलेल्या एम. एच. २४ ए.डी. २६५९ या क्रमांकाच्या ...

कु-हाडीने मारून केले जखमी; तिघांविरुद्ध गुन्हा
महानगरपालिका परिसरातून दुचाकी लंपास
लातूर : महानगरपालिकेच्या बाजूच्या रोडच्या कडेला
पार्किंग केलेल्या एम. एच. २४ ए.डी. २६५९ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अविनाश तुकाराम घोडके (रा. मळवटी ता. जि.लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घराचे कुलूप तोडून ७२ हजारांची चोरी
लातूर: शहरातील राधाकृष्ण अपार्टमेंट मध्ये फिर्यादी व फिर्यादीच्या शेजारील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण ७२ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत रमेश राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करत आहेत.