शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

जागतिक मानसिक आरोग्य दिन : आजारी पडणाऱ्या मनालाही जपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:28 IST

जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञ मिलिंद पोतदार यांच्याशी संवाद

लातूर : शरीर ज्याप्रमाणे आजारी पडते, त्याचप्रमाणे मानवी मनही आजारी पडत असते. शारीरिक आरोग्याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती आणि प्रबोधन केले जाते. मात्र मानसिक आरोग्याबाबत अद्यापही जाणीव जागृती केली जात नाही. त्यामुळे आजारी पडणाºया मनालाही आपण जपले पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी दिला. 

जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक पातळीवर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांच्या घरात आहे. मात्र भारतामध्ये हेच प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मानसिक आजाराचे बारा प्रकार असून, वेगवेगळ्या प्रकारचे २७५ आजार आहेत. परिणामी, प्रत्येकाने स्वत:वरील ताण-तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वैयक्तिक मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर त्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो. एकिकडे प्रगतीच्या तुलनेत आपण भरारी घेतोय. मात्र मानसिक आरोग्याच्या बाबतीत हा आलेख खालावतोय. ही बाब देशासाठी चिंतेची आहे. आरोग्यावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था लोकसंख्येच्या तुलनेत अल्प आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर सर्वांनी पुढे येऊन मानसिक आजाराचा सामना करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे आपण अभासी जीवन जगतोय. वास्तविक जीवनापासून आपण दूर जातोय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. मात्र त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक आहे. मोबाईल वापरामुळे नवनवीन आजार पुढे येत आहेत, असेही डॉ. पोतदार म्हणाले.

उत्तम आरोग्यासाठी आहार, व्यायाम गरजेचामानसिक आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. वैचारिक वाचन, तत्वज्ञानाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी योगासन, व्यायाम, सकस आहार आणि खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये या सर्व बाबींचे नियोजन केले, तर मनावरील ताण आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक आजार प्रत्येकाला टाळता येईल. मानसिक आजारापाठीमागच्या शास्त्रीय कारणांबाबत जनजागृती झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यmental hospitalमनोरूग्णालयMental Hai Kyaमेंटल है क्या