जागतिक हिवताप दिन साजरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:16+5:302021-04-21T04:20:16+5:30
लातूर विभागात २०१६ मध्ये १५ लाख ६२ हजार ८२३ रक्तनमुने संकलित करण्यात आले होते. त्यात हिवताप रुग्ण १४३ आढळून ...

जागतिक हिवताप दिन साजरा होणार
लातूर विभागात २०१६ मध्ये १५ लाख ६२ हजार ८२३ रक्तनमुने संकलित करण्यात आले होते. त्यात हिवताप रुग्ण १४३ आढळून आले. २०१७ मध्ये १५ लाख ३४ हजार ५९२ रक्त नमुने संकलित केले. त्यात हिवतापाचे ४४ रुग्ण आढळले. तर २०१८ मध्ये १४ लाख ५५ हजार २८२ रक्तनमुने गोळा करण्यात आले. त्यात ३२ रुग्ण आढळले असून, २०१९ मध्ये १५ लाख १७ हजार २३४ रक्तनमुने संकलित केले. त्यात आठ हिवताप रुग्ण आढळून आले. २०२० मध्ये १० लाख ७९ हजार ४०३ रक्तनमुने गोळा करण्यात आले. त्यात १७ रुग्ण आढळले. हिवताप रुग्णसंख्येत दरवर्षी घट झाली, हे आरोग्य यंत्रणेचे यश आहे. हिवताप आजार प्लाझ्मा मोडियम या परोपजिवी जंतूमुळे होतो. या आजाराचा प्रसार ॲनाफीलस डासाच्या मादीमार्फत होतो. जगात साधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते, असे हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ.एस.बी. ढगे यांनी सांगितले.