संतांचे कार्य मानवाच्या कल्याणाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:03+5:302021-02-17T04:25:03+5:30
वीर मठ संस्थान येथे आयोजित मनमत स्वामी जयंती व गणेश जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ...

संतांचे कार्य मानवाच्या कल्याणाचे
वीर मठ संस्थान येथे आयोजित मनमत स्वामी जयंती व गणेश जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. संत आणि देव यामध्ये संत श्रेष्ठ आहे. संतांनी देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवला, संतांनी निर्माण केलेले साहित्य भक्ती परंपरा ही मानवाच्या सुख कल्याण आणि समाधानासाठी कार्यरत आहे. गुरु आणि देव यामध्ये गुरु म्हणजेच संत सर्वश्रेष्ठ आहेत. तेच कल्याणकारी जीवनाचा मार्ग दाखवणारे आहेत, त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास सुखाने समाधानाची प्राप्ती होते,असे आचार्य स्वामी म्हणाले.
सोमवारी सायंकाळी बालाजी पाटील वेरुळकर यांचे कीर्तन झाले. तसेच बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मनमत स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दुपारी बारा वाजता भस्म उधळण करुन जन्मोत्सव साजरा केला . यावेळेस लिंगेश्वर भजनी मंडळ, वीर मठ संस्थान भजनी मंडळ नरशीह भाविक उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पद्मिनी खराडे, शीला शेटकर, मन कर्ण सोनटक्के, प्रेमा शेटे, मंदाकिनी पुणे, हरू नीटुरे, सुप्रिया घोटे, वत्सला काडवदे, विजया स्वामी, पद्मिनी ढोले, विजय पुणे, नंदकुमार ढोले, बाबुराव शिवपूजे, पद्मिनी गोकुंडे, नारायण मुस्तपूरे, चंदकांत रोडे यांनी सहकार्य केले.