मनरेगाची विहिरीचे मजुरांऐवजी जेसीबी यंत्राद्वारे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:56+5:302021-06-10T04:14:56+5:30
चापोली गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत ७ लाखांची पाणीपुरवठा विहीर ही २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आली. या विहिरीचे ब्रह्मवाडी ...

मनरेगाची विहिरीचे मजुरांऐवजी जेसीबी यंत्राद्वारे काम
चापोली गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत ७ लाखांची पाणीपुरवठा विहीर ही २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आली. या विहिरीचे ब्रह्मवाडी लघु साठवण तलाव येथे खोदकामही सुरू करण्यात आले आहे. २ व ३ जून रोजी ज्याठिकाणी पाणीपुरवठा विहिरीच्या खोदकाम चालू आहे. त्या जागेवर शकुंतला शेवाळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता विहिरीचे काम हे नियमाप्रमाणे मजुरांमार्फत करणे बंधनकारक असताना तेथे खोदकाम मजुरांऐवजी जेसीबी यंत्राद्वारे करीत असल्याचे निदर्शनास आले. मनरेगा योजनेंतर्गत यंत्राच्या साह्याने होत असलेले खोदकाम तात्काळ बंद करून मजुरांकडून करून पूर्णत्वास न्यावे, असेही शेवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना...
चापोली येथील मनरेगाअंतर्गत विहीर मंजूर आहे. विहिरीचे काम प्रत्यक्ष मजुरांकडून करून घ्यायला पाहिजे; परंतु तेथे जेसीबी यंत्राद्वारे काम करत असल्याची तक्रार शकुंतला शेवाळे यांची प्राप्त झाली आहे. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, चाकूर