एकाच दिवशी ८० शेत, पाणंद रस्त्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:42+5:302021-04-01T04:20:42+5:30
उदगीर तालुक्यातील शेत, पाणंद रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी तर जळकोट तालुक्यातील शेत, पाणंद रस्त्याच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी ...

एकाच दिवशी ८० शेत, पाणंद रस्त्याच्या कामास प्रारंभ
उदगीर तालुक्यातील शेत, पाणंद रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी तर जळकोट तालुक्यातील शेत, पाणंद रस्त्याच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून या दोन्ही तालुक्यांत ६०० किमीचे रस्ते तयार होणार आहेत. शेतीला जाणारा रस्ता हा ग्रामीण कृषी विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेत हे शेतकऱ्यांचे हृदय आहे, तर रस्ते या रक्तवाहिन्या व विकास वाहिन्या असल्यामुळे शेत, पाणंद रस्त्याच्या कामांना प्राधान्य दिले असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.
वर्षभरात उदगीर व जळकोट तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. ती कामे सुरू झाली आहेत. काही निविदा प्रक्रियेत आहेत. ती सर्व कामे येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले. रविवारी राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते उदगीर व जळकोट तालुक्यातील ८० शेत, पाणंद रस्त्याच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, कल्याण पाटील, शिवसेनेचे रामचंद्र अदावळे, चंद्रकांत टेंगेटोल, तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता मठपती, ज्ञानेश्वर पाटील, समीर शेख, श्याम डावळे यांच्यासह रोहयो विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.