जिल्ह्यात महिला दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:27+5:302021-03-10T04:20:27+5:30
रोशन उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ...

जिल्ह्यात महिला दिन उत्साहात साजरा
रोशन उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्था सचिव इस्माईल सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एच.पी. शेख, एस.एस. मुल्ला यांनी महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय.एस. काझी यांनी केले. तर माध्यमिकचे मुख्याध्यापक वाय.वाय. सय्यद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
दयानंद कला महाविद्यालयात महिला दिनानिमित्त महिला प्राध्यापक व प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा.डॉ. सुनीता सांगोले, डॉ. दिलीप नागरगोजे, गोविंद कांबळे, उपप्राचार्य अनिल माळी, डॉ. संदीप जगदाळे आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथे जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, मुख्याध्यापिका अरुणा कांदे, दीपमाला मस्के, उपसरपंच किशोर घार, नेताजी मस्के, शिवशरण थंबा, गोविंद सोदले, गोपाळ सारगे, कमलाकर होळकर, सदाशिव सारगे, शिवाजी घार आदींसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.
श्री केशवराज विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. मनीषाताई टोपरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सीताताई पारधे, सारिका चद्दे, स्वाती साखरे, शैलजा कुलकर्णी, इंदू ठाकूर, कांचन तोडकर आदींसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.
ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अलका धाराशिवे, मेघा धाराशिवे, डॉ. अनुराधा धाराशिवे, प्राचार्या फिरदोस देशमुख, स्वाती कापसे, सुवर्णा वागदरे, हलिमा अरब, सुलभा भोसले, रश्मी दूधनकर, दीपा पोतदार, वैष्णवी वाघमारे, समीक्षा निलंगेकर आदींची उपस्थिती होती.