महिलांनी पर्यावरणाच्या कार्यास प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:33+5:302021-03-19T04:18:33+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ लातूरच्या वतीने गुणवंत महिलांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ ...

महिलांनी पर्यावरणाच्या कार्यास प्राधान्य द्यावे
जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ लातूरच्या वतीने गुणवंत महिलांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी.आर. पाटील, डॉ. सुचिता भालचंद्र, अरुणा दिवेगावकर, प्रतीभा गोमसाळे, उमा व्यास, अनिता देशपांडे यांची उपस्थिती होती. डॉ. माया कुलकर्णी म्हणाल्या, महिलांनी समाज परिवर्तनासाठी व पर्यावरण संरक्षणासारख्या कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. प्रास्ताविकात डॉ. बी.आर. पाटील म्हणाले, बदलत्या परिस्थितीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलाशक्तीने अधिक जागरूक राहून पर्यावरणाच्या कार्यास प्राधान्य द्यावे. सूत्रसंचालन ज्योती मंगलगे यांनी केले, तर आभार आर.बी. जोशी यांनी मानले. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ. माया कुलकर्णी, डॉ. सुचिता भालचंद्र, अरुणा दिवेगावकर, प्रतिभा गोमसाळे, उमा व्यास, अनिता देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कॅप्शन : गुणवंत महिलांचा सत्कार...
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रतिभा गोमसाळे, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. बी.आर. पाटील.