अहमदपुरातील १३ गावांत महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:14+5:302021-02-06T04:34:14+5:30
चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संभाजी गायकवाड, उपसरपंच- बालाजी चाटे, खरबवाडीच्या सरपंचपदी शांताबाई बाबुराव कलवले, उपसरपंच संगीता उत्तम जगताप, नागझरीच्या सरपंचपदी ...

अहमदपुरातील १३ गावांत महिला राज
चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संभाजी गायकवाड, उपसरपंच- बालाजी चाटे, खरबवाडीच्या सरपंचपदी शांताबाई बाबुराव कलवले, उपसरपंच संगीता उत्तम जगताप, नागझरीच्या सरपंचपदी रामकिशन सूर्यवंशी, उपसरपंच उद्धव इप्पर, नरवटवाडीच्या सरपंचपदी भिवराबाई एकनाथ नरवटे, उपसरपंच मीरा राजेश पवार, खंडाळीच्या सरपंचपदी बबिता अशोक मोरे, उपसरपंच गिरीधर पौळ, परचंडाच्या सरपंचपदी शिवनंदा हिप्परगे, उपसरपंच उषा भागवत कदम, ढाळेगावच्या सरपंचपदी मनीषा ज्ञानेश्वर भिंगे, उपसरपंच शिवाजी भिकाणे, सावरगाव थोटच्या सरपंचपदी अनुपमा ईश्वर खंदारे, उपसरपंच बबिता देविदास कोनशेट्टे, मोघाच्या सरपंचपदी जयश्री रमेश कदम, उपसरपंच सुश्मिता बाळासाहेब कांबळे यांची निवड करण्यात आली.
आनंदवाडीचे सरपंचपद रिक्त राहिले असून, उपसरपंचपदी त्रिंबक घोगरे, सलगराच्या सरपंचपदी शेख महेबुबी अजमुद्दिन, उपसरपंच बाळासाहेब मोरे, धानोरा बु.च्या सरपंचपदी सुवर्णा रविकांत कोलपुसे, उपसरपंच अमोल जाधव, माकणीच्या सरपंचपदी मुद्रिका बाबू कांबळे, उपसरपंच आशा कुलकर्णी, आंबेगावच्या सरपंचपदी सत्यभामा भगवान पाटील, तर उपसरपंच वैशाली डावळे, शेणकुडच्या सरपंचपदी संग्राम नरवटे, उपसरपंच विद्या नागरगोजे, माळेगाव (खु.)च्या सरपंचपदी ज्योती चेवले, उपसरपंच गोरख कसबे, तेलगावच्या सरपंचपदी विद्याली संतोष मंदाडे, उपसरपंच पंढरीनाथ जाधव यांची निवड करण्यात आली. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या निवडी सुरळीत पार पडण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले.
सरपंचपदासाठी राजकीय डावपेच...
गुरुवारपासून सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, उर्वरित काही गावांत सरपंचपदासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. त्यामुळे त्यात कोणता गट बाजी मारणार, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, इच्छुक मंडळींनी सरपंचपदासाठी फिल्डिंग लावली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यात कितपत यश येते, हे लवकरच समजणार आहे.