स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महिलांनी अधिक परिश्रम घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:06+5:302021-03-13T04:36:06+5:30
येथील इनरव्हील क्लबच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ...

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महिलांनी अधिक परिश्रम घ्यावे
येथील इनरव्हील क्लबच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. अंजली स्वामी होत्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका चव्हाण, शारदा अंतूरे- मिरजकर, संगीता सोनटक्के, मीना हाके, प्रोजेक्ट चेअरमन सुनीता कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.
यावेळी विविध क्षेत्रांत नावलौकिक करणाऱ्या माहिलांचा गौरव सन्मानपत्र देऊन करण्यात आला. त्यात महिला सिनेदिग्दर्शक माहेश्वरी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका चव्हाण, पोकॉ. पूनम शेटे, प्राचार्या अनिता नवरखेले, मुख्याध्यापिका कांता रायवाड, लातूर रोडच्या सरपंच वसुंधरा मुंडे यांचा समावेश होता. निबंध स्पर्धेतील विजेत्या अनुजा नल्ले, अलविरा शेख, सुप्रिया महालिंगे, मधुरा बिडवे, प्राची केराळे, प्रतीक्षा पाटील, विद्यादर्शनी चौधरी, नंदिनी स्वामी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रभावती मोतीपवळे, सुषमा सोनटक्के, मधुरा पाटील, राजश्री साळी, ॲड. रत्नमाला नंदागवळे, रोहिणी बेद्रे, लक्ष्मी काटे, सरिता स्वामी, सुचिता मोहनाळे, उषा महालिंगे आदी उपस्थित होत्या.