पानगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:35+5:302021-09-23T04:22:35+5:30
यावेळी सारिका भोईटे म्हणाल्या, ग्रामीण भागात शेतीतील कच्चा माल सहज उपलब्ध होतो. त्यामुळे त्यासंदर्भातील व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगाचे ...

पानगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा
यावेळी सारिका भोईटे म्हणाल्या, ग्रामीण भागात शेतीतील कच्चा माल सहज उपलब्ध होतो. त्यामुळे त्यासंदर्भातील व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगाचे विविध मार्ग तसेच महिलांकडे उद्योजकीय गुणांचा वारसा यावर संवाद साधला. यावेळी प्रा.डॉ. संजय गवई यांनी पुरुषांपेक्षा महिलाच यशस्वी उद्योग करू शकतात. त्यांच्यामध्ये जन्मजातच व्यवस्थापन व काटकसर गुण असतात. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका होण्यासाठी पाऊल टाकावे, असेही ते म्हणाले. यावेळी उद्योजिका ज्योती शिंदे व साधना देशमुख यांना उद्योग उभा करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर कशी मात केली, याविषयी स्वानुभवातून कथन केले.
यावेळी कोरोना काळात सेवा बजावलेल्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. प्रास्ताविक भागवत शिंदे, सूत्रसंचालन लक्ष्मण लहाने यांनी केले. आभार प्रीतीताई भगत यांनी मानले. यावेळी वंदना केंद्रे, वाहेद शेख, भागवत कांदे, इम्रान मणियार, चेतन चौहान, संभाजी सिरसाट, प्रदीप गित्ते, सुरेश गालफाडे, अविनाश वाघमारे, बालाजी हानवते, नरसिंग भताने, शिवराज सिरसाट, दौलत मुंडे, शुभम डोंगरे, राम नागरगोजे, गणेश अबरबंडे, असिफ शेख, स्वप्निल चव्हाण, विठ्ठल चव्हाण, गोविंद कोते, विजय माने, प्रदीप जाधव आदींची उपस्थिती होती.