चालत्या ऑटोतून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:32+5:302021-09-17T04:24:32+5:30

जळकोट : शहरातील महात्मा फुले चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी उदगीर - जांब रस्त्यावर ऑटोतून पडून महिलेचा जागीच मृत्यू ...

Woman dies after falling from moving car | चालत्या ऑटोतून पडून महिलेचा मृत्यू

चालत्या ऑटोतून पडून महिलेचा मृत्यू

जळकोट : शहरातील महात्मा फुले चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी उदगीर - जांब रस्त्यावर ऑटोतून पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले, शेकापूर (ता. कंधार, जि. नांदेड) येथील कुटुंब (एमएच २६, के २८७२) या ऑटोने जळकोट तालुक्यातील सोनवळा येथे पाहुण्यांकडे गेले होते. सोनवळा येथून बुधवारी सायंकाळी परतत असताना उदगीर - नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर जळकोट शहरातील महात्मा फुले चौकाजवळ ऑटोतील महिला ललिता बाळू मुंडे (४७) यांचा मोबाईल धावत्या ऑटोतून रस्त्यावर पडला असता, तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असताना महिलेचा तोल जाऊन रस्त्यावर डोक्यावर पडल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होऊन त्या जागीच मरण पावल्या. या घटनेची माहिती जळकोट पोलीस स्थानकाला दिली असता, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा परकुटे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेल्यानंतर वाहन ताब्यात घेण्यात आले. ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा परकुटे यांनी दिली.

Web Title: Woman dies after falling from moving car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.