रेणापूर येथे निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:53+5:302021-03-21T04:18:53+5:30
येथील श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गाैरव करण्यात आला. आयाेजित बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ...

रेणापूर येथे निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गाैरव
येथील श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गाैरव करण्यात आला. आयाेजित बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कोल्हे यांची उपस्थिती हाेती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा चिकित्सक कार्यालय, लातूर आणि श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय, रेणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत ‘तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम’ यासह इतर विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राधिका चंद्रकांत शिरापुरे, निकिता बाळासाहेब शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. या विद्यार्थ्यांना रेणुका शिक्षण संस्थेच्या संचालिका अनिता विवेक भातिकरे, प्राचार्य बी.बी. कोल्हे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, कॉलेज बॅग देऊन गाैरविण्यात आले. यावेळी प्राचार्य कोल्हे म्हणाले, ‘पौगंडावस्था आयुष्याला कलाटणी देणारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे. तरच भावी आयुष्य सुखकर होईल. शिक्षणाने माणूस स्वावलंबी होतो. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसोबतच चांगले आरोग्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.’
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष देवीदासराव कुटवाड, उपाध्यक्ष माधवराव भातीकरे, सचिव ॲड. पंडितराव उगिले यांनी काैतुक केले. यावेळी प्रा. बी.एस. धायगुडे, प्रा. जे.एच. पठाण, प्रा. व्ही.एम. गिरी, प्रा. सी.के. मोटे, प्रा. बी.आर. सूर्यवंशी, प्रा. पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एल.आर. शेवाळे यांनी केले.