औसा शहरातील मुख्य रस्त्याचे हाेणार रुंदीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:50+5:302021-07-01T04:14:50+5:30
बैठकीत औसा शहर मुख्य रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लागणारा निधी, रस्त्यासाठी अधिग्रहित करण्यात येणारी जागा, यासाठी द्यावा लागणारा मावेजा, ...

औसा शहरातील मुख्य रस्त्याचे हाेणार रुंदीकरण
बैठकीत औसा शहर मुख्य रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लागणारा निधी, रस्त्यासाठी अधिग्रहित करण्यात येणारी जागा, यासाठी द्यावा लागणारा मावेजा, यासह इतर विषयावंर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, या कामासाठी किती निधीची आवश्यकता भासणार, जमीन अधिग्रहण करावी लागणार, मावेजा याबाबतची माहिती दोन दिवसात सादर करावी. अल्पसंख्याक बहुल परिसरात निधीची मागणी करण्यात आली असून, सदर निधी कुठल्या फंडातून देता येईल याची माहिती द्यावी, जनतेच्या हिताची कामे करताना दुजाभाव होऊ नये याकडे लक्ष द्यावे, दलित वस्तीतील तिन्ही स्मशानभूमीसाठी रस्ते तयार करण्यासाठी निधी खर्च करण्यात दुजाभाव होत असेल तर याची चौकशी करण्यात यावी, शासनाच्या रोड ऑफ बिझनेस धोरणानुसार दलित वस्ती विकास निधी खर्च केला जावा, दलित वस्तीत रस्ते, नाली, वीजपुरवठा पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात़ औसा नगरपालिकेने पाच वर्षातील विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, शासकीय निधीतून केलेल्या विकास कामाची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, विकास कामात वेळेचे बंधन व कामाचा दर्जा राखला जावा, आशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी बैठकीत औसा नगरपालिका अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपविभागीय अधिकारी सुनील यादव, श्रीशैल्य उटगे, शिवणे, नगरपालिका मुख्याधिकारी वसुधा फड, ॲड. समद पटेल, शेख शकील, ॲड. मंजुषा हजारे, अंगद कांबळे, अमर खाणापुरे, दत्तोपंत सूर्यवंशी, जयराज कसबे यांच्यासह लोकप्रतिनिधी, औसा नगरपालिका पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.