शेताकडे का यायचे नाही म्हणून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:19+5:302021-04-02T04:19:19+5:30
जुनी वापरातील ट्रक चोरीला लातूर : अहमदपूर तालुक्यातील कासनाळे पेट्रोल पंपनजीक पार्किंग केलेल्या एमएच ०५ एएन ०१४७ या क्रमांकाच्या ...

शेताकडे का यायचे नाही म्हणून मारहाण
जुनी वापरातील ट्रक चोरीला
लातूर : अहमदपूर तालुक्यातील कासनाळे पेट्रोल पंपनजीक पार्किंग केलेल्या एमएच ०५ एएन ०१४७ या क्रमांकाच्या ट्रकची चोरी झाल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. याबाबत अहमदपूर पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारची किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे, असे गुणवंत दादाराव बाजगिरे (रा. मरसांगवी, ता. जळकोट) यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे; गुन्हा दाखल
लातूर : सार्वजनिक रस्त्यावर गंजगोलाई येथे जनतेच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा रितीने वाहन रस्त्यावर उभे केल्याप्रकरणी एमएच २४ एटी ३९६८ या क्रमांकाच्या ऑटो चालकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गंजगोलाई येथे मधोमध ऑटो उभा करून प्रवासी घेताना सदर ऑटोचालक आढळून आला, अशी फिर्याद पोकॉ. गोपाळ माणिक देवकते यांनी दिली. त्यावरून सदर ऑटो चालकाविरुद्ध गांधी चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. गोसावी करीत आहेत.