भावांच्या भांडणात साक्षीदार का झालास म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:17+5:302021-03-15T04:18:17+5:30

हिप्पळगाव येथे शेतीच्या वाटणीवरून मारहाण लातूर : शेतीच्या वाटणीच्या वादावरून हिप्पळगाव येथे फिर्यादीस धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दगडाने ...

Why did you witness the quarrel of the brothers? | भावांच्या भांडणात साक्षीदार का झालास म्हणून मारहाण

भावांच्या भांडणात साक्षीदार का झालास म्हणून मारहाण

हिप्पळगाव येथे शेतीच्या वाटणीवरून मारहाण

लातूर : शेतीच्या वाटणीच्या वादावरून हिप्पळगाव येथे फिर्यादीस धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दगडाने फिर्यादीच्या तोंडावर मारून दात पाडून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव येथे घडली. याबाबत तुळशीराम मधुकर हाळे (रा. बेवनाळवाडी, ह.मु. हिप्पळगाव, ता. शिरूर अनंतपाळ) यांनी शिरूर अनंतपाळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर व्यंकोबा हाळे व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विनाकारण शिवीगाळ करून मारहाण

लातूर : विनाकारण शिवीगाळ करून मारहाण झाल्याची घटना उजेड येथील ढाब्यावर घडली. याबाबत बिलाल मैनोद्दीन शेख (रा. उजेड, ता. शिरूर अनंतपाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय सोपान मरडे (रा. उजेड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कच्छवे करीत आहेत.

नळेगाव रोड येथून दुचाकीची चोरी

लातूर : नळेगाव रोड येथील घरासमोर पार्किंग केलेल्या एमएफ २०-३७३५ या दुचाकीची चोरी झाल्याची घटना १३ मार्च रोजी घडली. याबाबत सूरज काशीनाथ पोस्ते (रा. पोस्तेनगर, नळेगाव रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Why did you witness the quarrel of the brothers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.