माझ्या वडिलांकडे पैसे का मागितलास म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:35+5:302021-05-21T04:20:35+5:30

दुचाकीला ट्रकची धडक; एकजण जखमी लातूर : किल्लारीजवळ भरधाव वेगातील एमएच २६ एडी ०५४४ या क्रमांकाच्या ट्रकचालकाने एमएच २४ ...

Why did you ask my father for money? | माझ्या वडिलांकडे पैसे का मागितलास म्हणून मारहाण

माझ्या वडिलांकडे पैसे का मागितलास म्हणून मारहाण

दुचाकीला ट्रकची धडक; एकजण जखमी

लातूर : किल्लारीजवळ भरधाव वेगातील एमएच २६ एडी ०५४४ या क्रमांकाच्या ट्रकचालकाने एमएच २४ के १९५२ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात दुचाकीवरील मुलगा जखमी झाला. याबाबत फक्रोद्दीन मकबुल मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध किल्लारी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. भोळे करीत आहेत.

किरकोळ कारणावरून मारहाण; गुन्हा दाखल

लातूर : गायीच्या समोरील कडबा टाकायचे लाकूड कोठे आहे असे विचारले असता फिर्यादीला मारहाण झाल्याची घटना विळेगाव, ता. अहमदपूर येथे घडली. याबाबत बालासाहेब पांडुरंग देवकते (रा. विळेगाव, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशन पांडुरंग देवकते व अन्य तिघांविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तीन एचपी इलेक्ट्रीकल मोटारची चोरी

लातूर : मळवटी रोड येथे दुकानासमोरील रसवंतीला जोडून ठेवलेली तीन एचपी तसेच पाच एचपी इलेक्ट्रिकल मोटारीची चोरी झाल्याची घटना १४ मे रोजी घडली. याबाबत रवी रमेश धुमाळ (रा. मळवटी रोड, ता.जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीला टिप्परची धडक

लातूर : बाभळगाव कॅनॉलवरील शेत सर्व्हे नं. ११५ येथे उभ्या केलेल्या एमएच २४ यू ३५७८ या क्रमांकाच्या दुचाकीला टिप्परचालकाने वाहन पाठीमागे घेताना भरधाव वेगात धडक दिली. त्यात मोटारसायकलीचे ४० हजारांचे नुकसान झाले. ही घटना १९ मे रोजी घडली. याबाबत चंद्रकांत गोपाळराव नाडागुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच १३ सीयु ९४४७ या क्रमांकाच्या टिप्पर चालकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. देवके करीत आहेत.

Web Title: Why did you ask my father for money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.