शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही, माझे काेणतेच काम का करत नाही? म्हणत ग्रामसेवकाला मारहाण करुन खाेलीत डांबलं, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 22:24 IST

याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात उपसरपंच नितीन शिवाजी जाधव याच्याविराेधात मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

लातूर : तुम्ही माझे काेणतेच काम करीत नाहीत? म्हणून उपसरपंचाने ग्रामसेवकाला शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय, कामकाज करत असलेल्या खाेलीचा दरवाजा बाहेरुन बंद करुन डांबून ठेवल्याची घटना शिरसी (ता.जि. लातूर) येथे शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात उपसरपंचाविराेधात गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. लातूर न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी साेमनाथ विठ्ठल निरुडे (वय ५४, रा. भातांगळी ता. लातूर, ह.मु. रविंद्रनाथ टागाेर नगर, लातूर) हे एप्रिल २०२५ पासून शिरसी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ते शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात जावून कामकाज करीत हाेते. सकाळी १० वाजता उपसरपंच नितीन शिवाजी जाधव हे कार्यालयात आले. त्यांनी तुम्ही माझे काेणतेच काम करीत नाहीत, म्हणून थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मारहाण करण्यासाठी अंगावर धाव घेतली. त्यावेळी फिर्यादीने आपण असे गैरवर्तन करुन नये, आपली अडचण काय आहे? मला सांगा. मी ती साेडविताे म्हणाले असता, त्यांनी शिवीकाळ करत मारहाण केली. गावात परत दिसल्यास तुझा पाय माेडून टाकताे, तू ग्रामपंचायत कार्यालयात आलास तर असेच काेंडून ठेवताे, अशी धमकी दिली. खाेलीचा बाहेरुन दरवाजा बंद करुन काेंडून ठेवले. त्यावेळी मी खिडकीतून आवाज दिल्यानंतर गावातील मकरंद शेळके, रामराजे जाधव, तुकाराम शिंदे हे आले. त्यांनी मला खाेलीचा दरवाजा उघडून बाहेर काढले.याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात उपसरपंच नितीन शिवाजी जाधव याच्याविराेधात मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन काेठडी...लातूर गटविकास अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. ग्रामपंचायत कार्यालयाला मी तातडीने भेट दिली. यावेळी उपसरपंचाला ताब्यात घेत पाेलिस ठाण्यात आणले. याबाबत गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक केली. न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. - अरविंद पवार, पाेलिस निरीक्षक, ग्रामीण पाेलिस ठाणे, लातूर

रक्तदाब व मधुमेह असल्याचे सांगितले...फिर्यादीने आपल्याला रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याची जाणिव करुन दिली. तरीही उपसरपंच जाधव याने शिवीगाळ करुन मारहाण केली. खाेलीचा दरवाजा बंद करुन डांबून ठेवत जायबंदी करण्याची व नाेकरी घालण्याची धमकी दिली, असेही ग्रामसेवकाने जबाबात म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस