शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कपडे धुताना मुलगी तलावात बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह चार जणीही बुडाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:39 IST

ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे.

अहमदपूर/ किनगाव/ अंधोरी (जि. लातूर) : तलावावर कपडे धुवताना अचानकपणे बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन मुली आणि दोन महिला अशा एकूण पाच जणी बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे घडली आहे. मयत ह्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत.

राधाबाई धोंडिबा आडे (४५), दिक्षा धोंडिबा आडे (२०), काजल धोंडिबा आडे (१९, सर्वजण रा. रामापूरतांडा, ता. पालम, जि. परभणी), सुषमा संजय राठोड (२१), अरुणा गंगाधर राठोड (२५, दोघेही रा. मोजमाबाद तांडा, ता. पालम, जि. परभणी) असे मयत पाच जणींची नावे आहेत. 

ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे. येत्या दोन दिवसांत साखर कारखाना बंद होणार असल्याने ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानकपणे एक मुलगी बुडत असल्याचे दिसू लागल्याने एकापाठोपाठ एकजण अशा चौघींनी वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, पोहता येत नसल्याने या पाच जणीही बुडाल्याने मृत्यू झाला. 

आपल्या कुटुंबातील नातेवाईक बुडत असल्याने जवळच असलेल्या १० वर्षीय मुलाने पाहिले आणि त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्या पाच जणींचा मृत्यू झाल्याचे किनगाव पोलिसांनी सांगितले. 

आई अन् दोन मुलींचा अंत...या दुर्देवी घटनेत राधाबाई आणि त्यांच्या दिक्षा व काजल या दोन मुलींचा करुण अंत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे